वातावरणाचे थर

Share

कथा: प्रा. देवबा पाटील

आमचे देशमुख सर आम्हाला रसायनशास्त्र इतक्या आनंदाने, तन्मयतेने, सुलभतेने व सोपे करून शिकवित की, डोक्यातील इतर वायफळ रसायने वाफ होऊन फटाफट बाहेर पडत व फक्त नि फक्त रसायनशास्त्रच तेवढे आमच्या डोक्यात चटकन शिरे. बरे ते नुसते डोक्यातच घुसे असे नव्हते, तर ते आमच्या डोक्यात पक्के ठसे. कारण देशमुख सर वर्गात शिकवताना नेहमी आम्हा मुलांना प्रश्न विचारण्यासाठी प्रोत्साहित करीत. तसेच तेही आम्हाला नेहमी प्रश्न विचारीत असत. त्यामुळे त्यांना प्रश्न विचारण्यासाठी व त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याकरिता आम्हाला सतत सतर्क राहावे लागायचे. वर्गात नेहमी लक्ष द्यावे लागायचे व घरूनही नियमित अभ्यास करूनच शाळेत यावे लागायचे. असे टप्प्याटप्प्याने आमचे रसायनशास्त्र परिपूर्ण होत होते.

ते दुसऱ्या तासात आले व म्हणाले, “आता आपण आपले वातावरण पुढे सुरू करू.” देशमुख सर म्हणाले. तसा रवींद्राने प्रश्न विचारण्यासाठी आपला हात वर केला. सरांनी त्याला प्रश्न विचारण्याची अनुमती दिली.
“सर, वायू तर सतत फैलावत राहतात. मग ते आपल्या पृथ्वीवर साठून कसे राहतात?” रविंद्राने प्रश्न केला.
“खरंच सर, ते आकाशात का निघून जात नाहीत?” कुंदाने मध्येच विचारले.

“वातावरण हे अनेक वायूंचे मिश्रण असते आणि पसरत राहणे हा वायूंचा गुणधर्म असतो. त्यांना जितकी जागा मिळेल तेवढी जागा ते व्यापून टाकतात. त्यांना जर अडविले नाही, तर ते अवकाशात निघूनही जातील; परंतु पृथ्वी आपल्या गुरुत्वाकर्षणशक्तीने या वातावरणास अडकवून ठेवते म्हणून पृथ्वीवर वातावरण टिकून राहते. पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या क्षेत्रातच हे सारे वायू फैलत राहतात, त्या क्षेत्राच्या मर्यादेबाहेर ते जाऊ शकत नाहीत. म्हणूनच ज्या ग्रहांचे गुरुत्वाकर्षण खूप कमी असते तेथे वातावरण नसते. चंद्राचे गुरुत्वाकर्षण कमी आहे म्हणूनच चंद्रावर वातावरण नाही.” सर म्हणाले.

“आपल्या पृथ्वीभोवतीचे वातावरण कसे असते सर?” महेंद्राने प्रश्न केला. सर म्हणाले, “पृथ्वीच्या सभोवती पृथ्वीच्या पृष्ठभागापासून विशेष म्हणजे समुद्रसपाटीपासून २२ कि.मी. अंतरापर्यंत उंचीच्या वातावरणात ९६% हवा असते. पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ वातावरण अतिशय दाट असते. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून जसजसे वर उंचावर जावे तसतसे वातावरण हे विरळ होत जाते म्हणजे हवा अतितशय विरळ होत जाते. पृथ्वीपासून २३३ कि.मी.पेक्षा जास्त उंच अंतरावर हवाच नसते. फक्त निर्वात पोकळी असते. शास्त्रज्ञांच्या मते पृथ्वीच्या वातावरणाची उंची अंदाजे ७५० ते १००० कि.मी.पर्यंत आहे.”

“सर, पृथ्वीभोवतीचे वातावरण सलग एकसंध असते का विभागलेले असते सर?” सुरेंद्राने विचारले., “पृथ्वीभोवतीच्या वातावरणाचे तीन थर असतात. पृथ्वीच्या वातावरणातील १० मैल उंचीच्या थराला जलदावरण किंवा तपांबर म्हणतात. जसजसे उंचावर जावे तसतसे या थरातील तापमान १० सें.ने कमी होत जाते. या थरातच ढग तयार होऊन पाऊस पडतो. हवेतील धूळसुद्धा या थरात साचते. त्यावरील जवळपास ३८ मैल उंचीच्या स्थिर तापमान असणाऱ्या थराला स्थितांबर अथवा स्थिरांबर किंवा स्थिरावरण म्हणतात. या भागात हवा विरळ असल्याने विमानांच्या उड्डाणासाठी हे आवरण सोयीचे असते. तर ३८ पेक्षा जास्त तर १८५ मैल उंचीपर्यंतच्या थरामध्ये वायूचे अणू-आयन असल्याने त्याला आयनांबर किंवा आयनावरण म्हणतात. यातूनच रेडिओ तरंग पृथ्वीकडे परावर्तित होत असतात व आपण ते कार्यक्रम ऐकू शकतो व टीव्हीवर बघू शकतो.” सरांनी सांगितले. “सर आम्ही व्हॅन ॲलन बेल्टचे नाव ऐकले आहे. तो कोठे व कसा असतो?” राजेंद्रने प्रश्न केला.

सर म्हणाले, “या आयनांबरामध्ये किरणोत्सर्गी द्रव्ये असलेला प्रखर उष्णतेचा पट्टा आहे. जे. व्हॅन ॲलन या शास्त्रज्ञाने त्याचा शोध लावला म्हणून त्याला व्हॅन ॲलन बेल्ट म्हणजे व्हॅलनचा पट्टा म्हणतात. सूर्याकडून पृथ्वीकडे येणारे प्रखर किरण थोपवून धरून ते सौम्य स्वरूपात पृथ्वीकडे पाठविण्याची शक्ती या पट्ट्यात असते.” तेवढ्यात तास संपला व सरांचे शिकवणेही थांबले नि खडू डस्टर उचलून सर वर्गाबाहेर पडले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Recent Posts

LSG vs DC, IPL 2025: के एल राहुलची तडाखेबंद खेळी, दिल्लीचा लखनऊवर ८ विकेटनी विजय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ४०व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने लखनऊ सुपर जायंट्सवर ८ विकेट्सनी विजय…

48 minutes ago

हिंदी अनिवार्य नाही तर ऐच्छिक ठेवणार; शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडून भूमिका स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रात पहिली ते पाचवीपर्यंत इंग्रजीबरोबर हिंदी भाषाही सक्तीची करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीकेची…

2 hours ago

Pahalgam Terror Attack: पहलगाम हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू

मुंबई: जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे आज, मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सुमारे २७ जणांचा मृत्यू…

2 hours ago

१५ जुलैपर्यंतच्या पाणीसाठ्याचे नियोजन करावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ग्रामीण असो किंवा शहरी भाग, लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये. उन्हाळा…

2 hours ago

मराठीचा अभिमान म्हणजे हिंदीचा द्वेष नव्हे…

इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर महाराष्ट्रात यापुढे पहिलीपासून हिंदी भाषा शिकवणे अनिवार्य होणार आहे.…

2 hours ago

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, २७ ठार तर १२ गंभीर जखमी

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटक आणि स्थानिकांवर अंदाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात २७ व्यक्तींचा…

2 hours ago