Wednesday, April 30, 2025

महामुंबईमहत्वाची बातमी

Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, १२ जणांचा मृत्यू

Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, १२ जणांचा मृत्यू

मुंबई: समृद्धी महामार्गावरील अपघाताच्या घटना काही थांबण्याचे नाव घेत नाही आहेत. याच महामार्गावर आणखी एक भीषण अपघात झाला आहे. देवदर्शन करून परतत असलेल्या भाविकांवर काळाचा घाला घातला गेला. या भीषण अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला तर २३ जण जखमी झाले आहेत.

हे भाविक सैलानी येथील दर्ग्यावरून परतत होते. त्या दरम्यान या महामार्गावरील वैजापूरच्या जांबरगाव टोलनाक्याजवळ ही दुर्घटना घडली. मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. जांबरगाव टोलनाक्याजवळ ट्रव्हल्स बस आणि ट्रक यांच्यात मोठा अपघात झाला. या अपघातात दहा ते बारा जण जागीच मृ्त्यूमुखी पडले.

या बसमधील हे प्रवासी सैलानी बाबा येथील दर्ग्याचे दर्शन घेऊन परतत होते. त्याचवेळेस हा भीषण अपघात झाला. या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे.

समृद्धी महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला भरधाव वेगाने येणाऱ्या टॅव्हल्सच्या बसने जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की बसच्या समोरच्या भागाचा पूर्ण चेंदामेंदा झाला. अपघाताची बातमी कळताच तातडीने तेथे मदतकार्य पोहोचवण्यात आले. या अपघातातील जखमींना छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले.

Comments
Add Comment