
दिल्ली: दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियममध्ये विश्वचषक २०२३मधील(world cup 2023) पहिला धक्कादायक निकाल लागला आहे. अफगाणिस्तानने(afganistan) इंग्लंडला(england) ६९ धावांनी हरवले आहे. हा पहिलाच धक्कादायक निकाल म्हणावा लागेल.
अफगाणिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करताना ५० षटकांत २८५ धावा केल्या होत्या. त्यानंतर इंग्लंडच्या संघाला अफगाणिस्तानने ४०.३ ओव्हरमध्ये २१५ धावांवर सर्वबाद केले. २०२३च्या विश्वचषकातील अफगाणिस्तानचा हा पहिलाच विजय आहे. तर इंग्लंडच्या तीन सामन्यांमधील त्यांचा हा दुसरा पराभव आहे.
अफगाणिस्तानसाठी मुजीब उर रहमान आणि रशीद खान यांनी तीन विकेट मिळवल्या. तर मोहम्मद नबीने दोन विकेट मिळवल्या. अफगाणिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करताना रहमनुल्लाह गुरबाझ यांच्या ८० धावांच्या जबरदस्त खेळीच्या जोरावर ५० षटकांत २८४ धावा केल्या होत्या. त्यांनी इंग्लंडसमोर विजयासाठी २८५ धावांचे आव्हान ठेवले होते.
मात्र अफगाणिस्तानच्या गोलंदाजांसमोर इंग्लंडची पळता भुई थोडी झाली. इंग्लंडच्या फलंदाजांना अडीचशे धावांचा टप्पाही गाठता आला नाही. त्यांचा संपूर्ण संघ २१५ धावांवर बाद झाला. अफगाणिस्तानच्या मुजीब उर रेहमान आणि रशीद खान यांनी प्रत्येकी ३ विकेट घेतल्या. तर मोहम्मद नबीने २ विकेट घेतल्या.