Sunday, August 10, 2025

Earthquake: दिल्ली-NCRमध्ये भूकंपाचे झटके, हरियाणाच्या फरीदाबादमध्ये होते केंद्र

Earthquake: दिल्ली-NCRमध्ये भूकंपाचे झटके, हरियाणाच्या फरीदाबादमध्ये होते केंद्र

नवी दिल्ली: दिल्ली-NCRमध्ये रविवारी भूकंपाचे(earthquake) तीव्र झटके बसले. दिल्लीसह नोएडा आणि गाझियाबादमध्ये रविवारी भूकंपाचे धक्के जाणवले. हरयाणाच्या अनेक भागांमध्येही भूकंप आला. याआधी ३ ऑक्टोबरला राजधानी दिल्ली आणि एनसीआरमध्ये भूकंपाचे झटके जाणवले. भूकंपाची तीव्रता इतकी जास्त होती की लोक आपल्या घरातून निघून रस्त्यावर आले. दरम्यान, या भूकंपामुळे कोणाचेही नुकसान झाल्याची बातमी नाही.


नॅशनल सेंटर फॉर सीस्मोॉलॉजीच्या माहितीनुसार दिल्ली-एनसीआरमध्ये आलेल्या भूकंपाची तीव्रता ३.१ रिश्टर स्केल इतकी होती. भूकंपाचे झटके संध्याकाळी ४ वाजून ८ मिनिटांनी जाणवले होते. भूकंपाचा केंद्र हरयाणाच्या फरीदाबाद येथे होते. रविवारी सुट्टी असल्याने लोक आपल्या घरातच होते. मात्र जसे भूकंपाचे धक्के जाणवले तसे लोक बाहेर पळत सुटले.


 


याआधी ३ ऑक्टोबरला नेपाळमध्ये ६.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप आणल्यानंतर दिल्ली एनसीआर तसेच उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले होते. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राने म्हटले होते भूकंपाचे केंद्रबिंदू काठमांडूपासून ७०० किमी पश्चिममध्ये बाझांग जिल्ह्याच्या तालकोट भागात दुपारी २.४० वाजता दाखल केला होता.



दिल्लीत ४ अथवा ४.५ तीव्रतेचे भूकंप


दिल्ली क्षेत्रामध्ये ४ अथवा ४.५ तीव्रतेचे भूकंप येणे ही सामान्य बाब आहे. गेल्या १०० वर्षात दिल्लीमध्ये साधारण २५ ते ३० असे भूकंप आले आहेत. यात काही खास नुकसान झालेले नाही. अशातच दिल्ली-एनसीआरमध्ये ५ च्या तीव्रतेपेक्षा कमी भूकंप आल्यास दिल्ली-एनसीआरवाल्यांना जास्त चिंता करण्याची गरज नाही.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा