
युवक राष्ट्रवादी कडून मंत्री छगन भुजबळांचा वाढदिवस उत्साहात साजरा
नाशिक : राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त मुंबई प्रदेशाध्यक्ष समीर भुजबळ, पंकज भुजबळ व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी क्रेनच्या सहाय्याने २५ फूट पुष्पाहार व शाल, फेटा घालत ढोल ताशांच्या गजराने जंगी स्वागत करून शुभेच्छा दिल्या. यावेळी युवक राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी जमा केलेल्या १००० वह्यांचे वाटप मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते गरजू शालेय विद्यार्थ्यांना करण्यात आले.
मंत्री छगन भुजबळ यांनी आवाहन केल्याप्रमाणे युवक राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून १००० वह्या भुजबळांच्या हस्ते गरजू शालेय विद्यार्थ्यांना देण्यात आल्या. भुजबळ यांचा वाढदिवस भुजबळ फार्म येथे पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांनी मोठ्या उत्साहात साजरा केला.

नाशिकच्या विकासासाठी दूरदृष्टी ठेवणारे मंत्री छगन भुजबळांची नाशिकच्या जनतेत विकासपुरुष अशी छबी असून नाशिक शहरासोबत जिल्ह्यातील इतरही विविध विकासाच्या प्रकल्पांना त्यांनी चालना दिली आहे. नाशिक फेस्टिव्हलच्या नियोजनात त्यांचा मोठा सहभाग राहिला आहे. राष्ट्रवादी युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे हे भुजबळ कुटुंबियांचे निकटवर्तीय असून मंत्री छगन भुजबळांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी जंगी तयारी करून ढोल ताशांच्या गजरात त्यांचा वाढदिवस साजरा केला.
यावेळी आमदार दिलीप बनकर, अॅड.रविंद्र पगार, योगेश निसाळ, चेतन कासव, मुकेश शेवाळे, अमोल नाईक, संदिप गांगुर्डे, विशाल डोके, राहुल कमानकर, डॉ. संदिप चव्हाण, संतोष भुजबळ, कुलदीप जेजुरकर, अक्षय पाटील, रविंद्र शिंदे, संदिप खैरे, अक्षय परदेशी आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.