लंगडी, विटी-दांडू, रस्सी खेच, दोरी उडी, लगोरीसह देशी खेळांच्या स्पर्धा मुंबईत रंगणार!

पारंपरिक क्रीडा महोत्सवाचे डिसेंबरमध्ये आयोजन


मुंबई : देशी खेळांना प्रोत्साहन मिळावे तसेच पारंपरिक क्रिडा प्रकार जपले जावेत यासाठी मुंबई उपनगर जिल्ह्यात डिसेंबर २०२३ मध्ये ‘छत्रपती शिवाजी महाराज पारंपरिक क्रिडा महोत्सव’ आयोजित केला जाणार आहे. महोत्सवाचे नियोजन देशी मैदानी क्रीडा संघटनांनी समन्वय साधून काटेकोरपणे करावे, असे निर्देश कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले.


देशी मैदानी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत मंत्री लोढा बोलत होते. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी वर्षा साळवी, मालाडचे उपजिल्हाधिकारी धनाजी तोरस्कर, उपजिल्हाधिकारी संदीप निचीत, क्रीडा भारतीचे श्रीकांत धर्माधिकारी, डॉ. उत्तम केंद्रे, सदस्य गणेश विचारे तसेच विविध देशी मैदानी क्रीडा संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.



मंत्री लोढा म्हणाले, आपले पारंपरिक क्रीडा प्रकार लुप्त होवू नयेत यासाठी अशा प्रकारचे क्रीडा महोत्सव केले जावेत, अशी मागणी वारंवार केली जाते. ही मागणी पाहता डिसेंबर महिन्यात खो-खो, दंड बैठक, मल्लखांब, लंगडी, विटी-दांडू, लगोरी, अखाडा कुस्ती, मानवी मनोरा (पिरॅमिड), रस्सी खेच, दोरी उडी, सूर्यनमस्कार, पावनखिंड दौड, शरीरसौष्ठव, तलवार बाजी, ढाल तलवार आदी मैदानी खेळांचा समावेश करुन पंधरा दिवसांच्या क्रीडा महोत्सवाचे नियेाजन करण्यात येणार आहे. क्रीडा महोत्सवास संपूर्ण सहकार्य केले जाईल. या महोत्सवा दरम्यान खेळाडूंना विविध सोयी-सुविधा पुरविण्यात याव्यात. नियोजन काटेकोरपणे करावे अशा सूचना पालकमंत्री लोढा यांनी यावेळी केल्या.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

आयर्लंडच्या कर्णधाराचा कहर, केली ऐतिहासिक कामगिरी

कोलंबो : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये ओमान विरूद्धच्या सामन्यात आयर्लंडचा प्रभारी कर्णधार लॉर्कन

स्कॉटलंडचे आव्हान इंग्लंडने १० चेंडू राखून परतवले

कोलंबो  : टी-२० विश्वचषकाच्या अटीतटीच्या सामन्यात इंग्लंडने स्कॉटलंडचे आव्हान ५ गडी राखून मोडीत काढले. सलामीवीर

लॉर्कनच्या तुफानी खेळीने आयर्लंडचा विजय, ओमानच्या गोलंदाजांची पळता भुई थोडी

कोलंबो  : आयर्लंडने आपल्या फलंदाजीच्या जोरावर टी-२० विश्वचषकात नवा इतिहास रचला आहे. प्रभारी कर्णधार लॉर्कन

T20 World Cup 2026 IND vs PAK: अभिषेक शर्माबद्दल बोलताना पाकिस्तानी बॉलरची जीभ घसरली; म्हणाला...

कोलंबो: आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये रविवार १५ फेब्रुवारी २०२६ रोजी कोलंबोच्या प्रेमदासा

T20 World Cup 2026 IND vs PAK : भारत-पाक मॅच रद्द झाल्यास सुपर ८ मध्ये कुठली टीम जाणार ?

कोलंबो: आयसीसी पुरुष टी ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये रविवार १५ फेब्रुवारी २०२६ रोजी कोलंबोच्या प्रेमदासा

कोलंबोत आज आर-पारची लढाई, विजयाची हॅटट्रिक कोण मारणार?

कोलंबो  : क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी आणि बहुप्रतिक्षित लढत रविवारी श्रीलंकेच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर