अहमदाबाद: आयसीसी क्रिकेट विश्वचषक २०२३मध्ये(world cup 2023) भारत(india) आणि पाकिस्तान(pakistan) यांच्या बहुप्रतिक्षित सामना १४ ऑक्टोबरला नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगत आहे. दोन्ही संघ या सामन्यासाठी अहमदाबादमध्ये पोहोचले आहेत. दोन्ही संघादरम्यानचा सामन्याचा फिव्हर चाहत्यांवर आतापासूनच दिसत आहे.
या महामुकाबल्यात भारताचे नेतृत्व रोहित शर्मा करत आहे तर बाबर आझमच्या खांद्यावर पाकिस्तानची जबाबदारी असेल. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी २ वाजता खेळवला जाईल. या सामन्यासाठी चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे.
हा सामना पाहण्यासाठी अहमदाबादशिवाय गुजरातसह अन्य राज्यातूनही मोठ्या संख्येने प्रेक्षक येणार आहेत. काही चाहते तर परदेशातून भारत-पाकिस्तान सामन्यासाठी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पोहोचणार आहेत.
We are here in Ahmedabad! 👋#CWC23 | #TeamIndia | #INDvPAK | #MeninBlue pic.twitter.com/dVuOaynYRN
— BCCI (@BCCI) October 12, 2023
या ब्लॉकबस्टर सामन्यामुळे अहमदाबादमधील हॉटेलचे दर प्रचंड वाढले आहेत. अशातच काही प्रेक्षकांनी तर हेल्थ चेकअपच्या बहाण्याने अहमदाबादच्या हॉस्पिटलमध्ये थांबण्याची व्यवस्था केली आहे.
अहमदाबाद मेडिकल असोसिएशनचे प्रेसिडंट डॉक्टर तुषार पटेलने सांगितले, १४ ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये सामना आहे अशातच हॉटेलचे दर अनेक पटींनी वाढले आहेत. यामुळे काही प्रेक्षकांनी आपल्या थांबण्याची व्यवस्था हॉस्पिटलमध्ये केली आहे. हे चाहते सकाळी अहमदाबादमध्ये येतील आणि हॉस्पिटलमध्ये हेल्थचेकअप करून दुपारपर्यंत सामना पाहण्यासाठी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये पोहोचतील. सामना संपताच रात्री पुन्हा हॉस्पिटलमध्ये थांबतील.
चाहत्यांचे हेल्थ चेकअपच्या रात्री थांबण्याची व्यवस्था केल्या जाण्याबद्दलची बातमी समोर आल्यानंतर अहमदाबाद हॉस्पिटल आणि नर्सिंग होम असोसिएशनचे प्रेसिडंट भरत गढवी यांचे विधान समोर आले आहे. भरत म्हणाले, कोणत्याही रुग्णालयात सामना पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांची थांबण्याची व्यवस्था करणे योग्य नाही. हॉस्पिटल हे रुग्ण आणि त्यांच्या उपचारांसाठी आहे. या कार्यक्रमासाठी अरजित सिंह, सुखविंदर सिंह आणि शंकर महादेवन यांचे संगीत कार्यक्रम होणार आहेत.
अहमदाबादमध्ये होणाऱ्या सामन्यासाठी अनेक प्रसिद्ध चेहरेही मैदानात येतील. यात अमिताभ बच्चन, रणबीर कपूर, सचिन तेंडुलकर, रजनीकांत, आदर पूनावाला यांचा समावेश आहे. या सामन्यासाठी सकाळी १० वाजल्यापासून नरेंद्र मोदी स्टेडियमचे दरवाजे चाहत्यांसाठी खोलले जातील. दुपारी १२.३० वाजता मैदानात मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
Kickstarting the much-awaited #INDvPAK clash with a special performance! 🎵
Brace yourselves for a mesmerising musical special ft. Arijit Singh at the largest cricket ground in the world- The Narendra Modi Stadium! 🏟️
Join the pre-match show on 14th October starting at 12:30… pic.twitter.com/K6MYer947D
— BCCI (@BCCI) October 12, 2023
७ हजार पोलीस कर्मचारी तैनात
प्रेक्षकांच्या सुविधेसाठी मैदानाजवळ तब्बल १५ पार्किंग प्लॉट बनवण्यात आले आहेत. अहमदाबादमध्ये चालणारी मेट्रो तसेच बीआरटीएस सुविधा वाढवण्यात आल्या आहेत. रात्री दीड वाजेपर्यंत ही सुविधा सुरू असणार आहे. तब्बल ७०० पोलीस कर्मचारी येथे सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत.