अहमदाबाद: भारत(india) आणि पाकिस्तान(pakistan) सामन्याआधी भारताचा कर्णधार रोहित शर्माने(rohit sharma) पत्रकार परिषद घेतली. यात त्याने शुभमन गिलबाबत(shubman gill) मोठे अपडेट देताना सांगितले की सामन्यासाठी गिल ९९ टक्के फिट आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात १४ ऑक्टोबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सामना खेळवला जात आहे. चाहते या सामन्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत.
या वर्ल्डकपमध्ये भारताचा हा तिसरा सामना आहे. टीम इंडियाने याआधीचे दोनही सामने जिंकले आहेत. संघाने पहिला सामना ऑस्ट्रेलिया आणि दुसरा बांगलादेशविरुद्ध जिंकला होता. रोहित शर्माने पत्रकार परिषदेत संघाच्या बॉलिंग कॉम्बिनेशनबाबत सांगितले. भारताचा कर्णधार तीन स्पिनर्ससह उतरणार का यावर उत्तर देताना रोहित म्हणाला आतापर्यंत बघितलेली नाही. गरज पडल्यास खेळाडू पुढे येण्यास तयार आहे.
रोहित शर्माने सोशल मीडियाबाबत बोलताना सांगितले की तो गेल्या ९ महिन्यांपासून सोशल मीडियावर नाही आहे. भारताच्या कर्णधाराने सांगितले की बाहेरचा आरडाओरडा बंद करण्यासाठी हे केले आहे. त्याने सांगितले की सगळ्यांची आपापली पद्धत असते.
पाकिस्तानविरुद्ध सामन्यात अहमदाबादच्या मैदानावरील दवाबाबत भारताच्या कर्णधाराने म्हटले की मला नाही माहीत की याचा किती प्रभाव पडेल. चेन्नई अथवा दिल्लीत याचा काही जास्त फरक पडला नाही. त्यामुळे टॉसमुळे असा काही मोठा फरक पडू शकत नाही.
पाकिस्तानविरुद्धच्या रेकॉर्डवर प्रतिक्रिया
रोहित शर्माने पाकिस्तानविरुद्ध विश्वचषकातील ७-० रेकॉर्डबाबत म्हटले की तो अशा रेकॉर्ड्सवर लक्ष देत नाही. तो केवळ या गोष्टीवर लक्ष देतो की तो एक संघ म्हणून चांगली कामगिरी कशी करेल. भारताने पाकिस्तानला आतापर्यंत वर्ल्डकपमध्ये नेहमी हरवले आहे. दोन्ही संघ ७ वेळा आमनेसामने आले होते.