Tuesday, November 5, 2024
Homeताज्या घडामोडीम्हाडा एजंट व एमएमआरडीए अभियंत्याने १८ लाखांची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल

म्हाडा एजंट व एमएमआरडीए अभियंत्याने १८ लाखांची फसवणूक केल्याबद्दल गुन्हा दाखल

मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA) एजंट आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) अभियंता यांच्यावर १८ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलुंड पूर्व येथील रमेश वाघचौरे (५०) आणि गोरेगाव पूर्व येथील गणेश सोनवणे (५०) अशी आरोपींची नावे असून त्यांनी रमेश लाड (६२) यांना परवडणाऱ्या घराचे खोटे आश्वासन देऊन त्यांची फसवणूक केली.

एफआयआरनुसार, व्यवसायातून निवृत्त झालेले आणि रोलिंग हिल्स को-ऑप-सोसायटी, एलआयसी कॉलनी, बोरिवली पश्चिम येथे राहणारे रमेश लाड यांची एका नातेवाईकाने म्हाडा एजंट गणेश सोनवणे याच्याशी ओळख करून दिली होती. २०१७ मध्ये सोनवणे याने लाड यांच्या नातेवाईकासह लाड यांच्या घरी भेट दिली आणि जोगेश्वरी पूर्व येथे कमी किमतीत फ्लॅट देऊ केला. हा करार एकूण २८ लाख रुपयांमध्ये झाला, ज्याचे हप्त्यांमध्ये पेमेंट करायचे होते.

पुढे ८ दिवसांनंतर सोनवणे याने लाड यांना १५ दिवसांत फ्लॅटचा ताबा देण्याचे आश्वासन देऊन, एमएमआरडीए अधिकाऱ्याला ६.५० लाख रुपये द्यावे लागतील असे सांगितले. लाड यांनी सोसायटीचे कर्ज घेऊन सोनवणेला ६.५० लाख रुपये दिले. नंतर सोनवणे याने लाड यांना १० लाख त्याच्या बँक खात्यात आणि १० लाख एमएमआरडीएचा अभियंता रमेश वाघचौरे याला हस्तांतरित करण्यास सांगितले. नंतर, एक महिन्याने लाड यांनी फ्लॅटच्या ताब्याबाबत चौकशी केली असता, बांधकाम सुरू असून, आणखी सहा महिने लागतील, असा दावा सोनवणे याने केला.

त्यानंतर सदनिकेचा ताबा मिळावा यासाठी लाड यांनी वारंवार सोनवणे व वाघचौरे यांच्याशी संपर्क साधला, मात्र दोघांनी वेगवेगळी सबब सांगितली. पुढे २०२१ मध्ये सोनवणे याने लाड यांना स्वत:चे घर हस्तांतरित करण्याचे आश्वासन दिले आणि करार केला, परंतु तो प्रत्यक्षात आला नाही. त्यांनतर २०२२ आणि २०२३ मध्ये वाघचौरे याने ८.५० लाख रुपये लाड यांना परत केले. परंतु उर्वरित १८ लाख आरोपींकडे राहिले. अखेर लाड यांनी त्यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला आणि तक्रार दाखल केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -