नवी दिल्ली: भारतात सुरू असलेल्या विश्वचषक २०२३च्या(world cup 2023) स्पर्धेत अनेक जबरदस्त सामने पाहायला मिळत आहेत. पाच वेळा विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाला अद्याप विजयाचा सूर गवसलेला नाही तर टीम इंडिया, न्यूझीलंड, पाकिस्तान हे संघ फॉर्मात दिसत आहेत.
विश्वचषक सुरू झाल्यानंतर एक आठवडा होता आहे त्यामुळे गुणतालिकेतही मोठा बदल पाहायला मिळत आहे. ऑस्ट्रेलिया आणि द. आफ्रिका यांच्यात गुरूवारी झालेल्या सामन्यात गुणतालिकेत चांगलाच बदल पाहायला मिळाला. ऑस्ट्रेलियावर तब्बल १३४ धावांनी विजय मिळवणाऱ्या द. आफ्रिकेने या गुणतालिकेत पहिले स्थान मिळवले आहे.
त्यांचा ऑस्ट्रेलियावरील विजय जबरदस्त होता. पहिल्यांदा त्यांनी फलंदाजी करताना ३११ धावा केल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या संघाला १७७ धावांवर रोखले.
गुणतालिकेत कोण कितव्या स्थानावर
द. आफ्रिकेचा संघ या गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. त्यांनी २ पैकी २ सामने जिंकलेत. त्यानंतर न्यूझीलंड दुसऱ्या स्थानावर,भारत तिसऱ्या स्थानावर, पाकिस्तान चौथ्या स्थानावर आहे. या सर्व संघांनी २ पैकी २ सामने जिंकलेत. इंग्लड या गुणतालिकेत पाचव्या स्थानावर, बांगलादेश सहाव्या, श्रीलंका सातव्या स्थानावर आहे. नेदरलँडचा संघ आठव्या स्थानावर आहे. तर आश्चर्यजनक ऑस्ट्रेलियाचा संघ नवव्या स्थानावर आहे.