India vs Pakistan: पाकिस्तानविरुद्ध भारताच्या प्लेईंग ११मध्ये बदल?

अहमदाबाद: आस्ट्रेलिया(australia) आणि अफगाणिस्तानला(afganistan) विश्वचषकात हरवल्यानंतर टीम इंडियाचा १४ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्ध सामना रंगत आहे. दोन्ही संघादरम्यानचा हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगणार आहे.


भारतीय संघाने विश्वचषकातील पहिले दोनही सामने जिंकले आहेत त्यामुळे टीम इंडियाचा आत्मविश्वास दुणावला आहे. मात्र अद्यापही संघात काही कमतरता आहेत. या कमतरता दूर झाल्या तर टीम इंडियाचे विजयी अभियान असेच सुरू राहू शकते आणि वर्ल्डकपचा दावेदारही संघ बनू शकतो.


सलग दोन सामन्यात विजय मिळवल्यानंतरही टीम इंडियाला काही बाबतीत सुधारण्याची गरज आहे. जर सुरूवातीला इशान किशनबाबत बोलायचे झाल्यास दिल्ली येथील सामन्यात त्याने ४७ धावा केल्या. मात्र त्याच्या खेळीमध्ये आत्मविश्वासाठी कमतरता जाणवली. तर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात तो खूपच गैरजबाबदार दिसला.


दिल्लीच्या अरूण जेटली स्टेडियममध्ये अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात जसप्रीत बुमराहने ३९ धावा देत ४ विकेट मिळवल्या होत्या मात्र गोलंदाजीत दुसरीकडे त्याचा पार्टनर मोहम्मद सिराजची चांगलीच धुलाई झाली. त्याने आपल्या ९ ओव्हरमध्ये ७६ धावा दिल्या होत्या. अशातच मोहम्मद शमीला सिराजच्या जागी संधी दिली जाऊ शकते.

Comments
Add Comment

Ranji Trophy: १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी बिहार रणजी संघाचा उपकर्णधार

साकिबुल गनीकडे नेतृत्वाची धुरा मुंबई : १५ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफी २०२५-२६ हंगामासाठी बिहार

कुलदीप यादवने दिल्लीमध्ये केले नको ते शतक, बनवला हा खराब रेकॉर्ड

नवी दिल्ली: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय संघाचा चायनामन फिरकी

भारताला शेवटच्या दिवशी जिंकण्यासाठी हव्या ५८ धावा

नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये कसोटी सामना सुरू आहे. या

भारताला जिंकण्यासाठी हव्या १२१ धावा

नवी दिल्ली : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये कसोटी सामना सुरू आहे. या

IND vs WI:चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरूवात, भारताला विकेटची प्रतीक्षा

नवी दिल्ली: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवसाच्या खेळाला

वर्ल्डकपमध्ये दोन पराभव, टीम इंडिया सेमीफायनलमध्ये पोहोचू शकेल का? जाणून घ्या समीकरण

मुंबई: महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये रविवारी भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाच्या हातून पराभवास सामोरे जावे लागले. या