मुंबई : ज्येष्ठ अभिनेत्री भैरवी वैद्य (Bhairavi Vaidya) यांचे निधन झाले. त्या ६७ वर्षांच्या होत्या. त्यांच्या जाण्याने मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून त्या कर्करोगाशी झुंज देत होत्या. मात्र अखेर ही झुंज अपयशी ठरली आहे. त्यांनी सुमारे ४५ वर्ष मनोरंजनसृष्टीमध्ये काम केले आहे.
भैरवी यांनी अनेक चित्रपटांसह टीव्ही मालिकांमध्ये अनेक भूमिका साकारलेल्या आहेत. हिंदीसह त्यांनी गुजराती चित्रपटामध्ये देखील काम केले. ऐश्वर्या राय बच्चनच्या ताल या चित्रपटामधील जानकी ही भूमिका साकारून त्यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तसेच चोरी चोरी चुपके चुपके या सलमान खानच्या चित्रपटामध्ये देखील त्यांनी काम केले होते. नीमा डेन्जोंगपा या मालिकेतील त्यांच्या पुष्पा या भूमिकेचे विशेष कौतुक झाले.
View this post on Instagram
त्याचबरोबर व्हॉट्स योर राशी, हमराज, क्या दिल ने कहा, व्हेंटिलेटरमध्ये त्या प्रतिक गांधीसोबत दिसल्या होत्या. या चित्रपटांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका साकारली होती.
त्यांच्या जाण्याने चित्रपट आणि टीव्ही विश्वाचं मोठं नुकसान झालं आहे. त्यांच्या निधनावर अनेक कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे.
View this post on Instagram
‘व्हेंटिलेटर’ या चित्रपटात भैरवी यांच्यासोबत प्रतीक गांधीनं काम केलं. भैरवी यांच्या निधनानंतर प्रतीकनं भैरवी यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. त्यानं सांगितलं, व्हेंटिलेटर चित्रपटात त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मला मिळाली. आमच्यात खूप छान बॉन्डिंग होते. मी त्यांना माझ्या लहानपणापासून टीव्हीवर पाहत आलो आहे. त्यांचा हसरा चेहरा मी कधीच विसरू शकत नाही.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra