नवी दिल्ली: हमासविरुद्द सुरू असलेल्या युद्धादरम्यान इस्त्रायलच्या विविध शहरांमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना तेथून परत आणण्याचे काम सुरू झाले आहे. यासाठी भारत सरकारने ऑपरेशन अजय लाँच केले. या ऑपरेशन अंतर्गत २१२ भारतीयांना घेऊन इस्त्रायलच्या बेन गुरियन विमानतळावरून पहिले विमान दिल्लीला पोहोचले आहे.
इस्त्रायलच्या वेळेनुसार भारतीय नागरिकांनी भरलेले हे विमान रात्री ९ वाजण्याच्या सुमारास बेन गुरियन विमानतळावरून निघाले. या विमानात २१२ प्रवासी होते. एअर इंडियाचे हे विमान शुक्रवारी सकाळी ६ वाजता दिल्लीला पोहोचले आहे. दिल्ली एअरपोर्टवर राजीव चंद्रशेखर यांनी भारतीय नागरिकांचे स्वागत केले.
#OperationAjay gets underway.
212 citizens onboard the flight are enroute New Delhi. pic.twitter.com/fGSAYiXbBA
— Dr. S. Jaishankar (@DrSJaishankar) October 12, 2023
भारत सरकारने इस्त्रायल आणि हमास या युद्धादरम्यान इस्त्रायलमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी ऑपरेशन अजय लाँच केले आहे. ७ ऑक्टोबरला युद्ध सुरू झाल्यानंतर एअर इंडियाने इस्त्रायलला जाणारी सर्व विमाने रद्द केली होती. यामुळे अनेक भारतीय नागरिक इस्त्रायलमध्ये अडकले होते.
विशेष बाब म्हणजे ऑपरेशन अजय अंतर्गत भारत सरकार ज्या लोकामना भारतात परत आणत आहे त्यांना कोणतेही प्रकारचे भाडे द्यावे लागत नाही आहे. इस्त्रायलमध्ये १८ हजार भारतीय वंशाचे लोक राहतात.
तेल अवीवमध्ये एअरपोर्टवर गर्दी
ऑपरेशन अजय अंतर्गत भारतात येणाऱ्या विमानात चढण्यासाठी इस्त्रायलच्या तेल अवीवच्या एअरपोर्टवर लोकांची मोठी गर्दी झाली आहे. परतणाऱ्यांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे.