Tuesday, July 1, 2025

Election duty: निवडणूक ड्युटीपासून पळ काढण्यासाठी ५ दिवसांत ५०० अर्ज

Election duty: निवडणूक ड्युटीपासून पळ काढण्यासाठी ५ दिवसांत ५०० अर्ज

ग्वालियर: मध्यप्रदेशात विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच या ड्युटीपासून पळ काढणाऱ्यांची मोठी रांग लागली आहे. लगेचच प्रशासनाकडे यासाठीचे अर्ज येण्यास सुरूवात झाली आहे. यात एकाहून एक असे बहाणे दिले जात आहे.ज्यामुळे वाचणाऱ्यांचे मात्र मनोरंजन होत आहे.


विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच निवडणूक ड्युटीपासून पळ काढण्यासाठी आता सुट्टीचे अर्ज येऊ लागले आहेत. या अर्जामध्ये ड्युटीपासून पळ काढण्यासाठी अर्जदारांनी जी काही कारणे दिली आहेत ती हसण्यासारखीच आहेत. मध्य प्रदेश इंडस्ट्रियल कॉर्पोरेशनमध्ये मॅनेजर पदावर असलेल्या एका अधिकाऱ्याने लिहिले की, माझी अचानक स्मृती निघून जाते. दोन-दोन तास विस्मृतीत जातो. अशातच निवडणूक ड्युटी कशी करता येईल. दरम्यान स हा अर्ज प्रशासनाने मेडिकल बोर्डाकडे पाठवला आहे.



एकाहून एक बहाणे


लष्कर सर्कलच्या एका सरकारी शाळेतील प्रिन्सिपलने निवडणूक ड्युटीपासून पळ काढण्यासाठी दिलेल्या अर्जात लिहिले की, माझ्या हिमोग्लोबिनचा स्तर कमी असतो. हा आकडा कमी जास्त होत असतो. या कारणामुळे ३० ते ४० मिनिटे मी बेशुद्धही होतो. अशातच मी निवडणूक ड्युटी कशी करू शकतो.



५ दिवसांत ५०० अर्ज


९ ऑक्टोबरला निवडणुकीची घोषणा झाली आहे आणि ५ दिवसांत तब्बल ५००हून अधिक असे अर्ज आले आहेत. यात एकूण असे १३० अर्ज आहेत ज्यात निवडणूक ड्युटीपासून पळ काढण्यासाठी अनेक अजबगजब कारणे देण्यात आली आहेत.

Comments
Add Comment