लखनऊ: दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगलेल्या एकदिवसीय विश्वचषक २०२३मधील(world cup 2023) सामन्यात आफ्रिकेने तब्बल १३४ धावांनी विजय मिळवला आहे. आफ्रिकेने विजयासाठी ठेवलेले ३१२ धावांचे आव्हान पूर्ण करता करता ऑस्ट्रेलियाची पुरती दमछाक झाली आणि ऑस्ट्रेलियाचा डाव १७७ धावांवर आटोपला.
आफ्रिकेच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना पुरते हैराण केले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला दोनशे धावांचा टप्पाही गाठता आला नाही. ऑस्ट्रेलियाला वाटलेही नव्हते की त्यांना इतक्या मोठ्या फरकाने हरावे लागल. ऑस्ट्रेलियाकडून मार्नस लांबुश्गनेने सर्वाधिक ४६ धावांची खेळी केली. बाकी इतर फलंदाज साफ अपयशी ठरले.
द. आफ्रिकेने पहिल्यांदा फलंदाजी करताना ३११ धावा केल्या. क्विंटन डी कॉकने जबरदस्त १०९ धावांची खेळी केली. तर एडन मार्करेमने ५६ धावांची खेळी केली. याच्या जोरावर द. आफ्रिकेने ७ बाद ३११ धावा केल्या.
त्यानंतर ऑस्ट्रेलिया ३१२ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरली. मात्र आफ्रिकेच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना पुरते धुतले. ऑस्ट्रेलियाचा डाव केवळ १७७ धावांवर आटोपला.