Monday, July 22, 2024
Homeताज्या घडामोडीप्रियंका गांधींनी जेव्हा सभेत काँग्रेस कार्यकर्त्याला मारला डोळा

प्रियंका गांधींनी जेव्हा सभेत काँग्रेस कार्यकर्त्याला मारला डोळा

मंडला: मंडलाच्या रामनगरमध्ये आज अशी काही घटना घडली की ज्यामुळे एकच हशा पिकला. प्रियंका गांधींनी आपल्या सर्वसाधारण सभेत एका काँग्रेस कार्यकर्त्याला डोळा मारला. एका कार्यकर्त्याच्या बोलण्यावरून प्रियंका गांधींनी डोळा मारला.

कार्यकर्त्यांसोबत त्यांच्या संवादावर सगळेच हसताना दिसले. मात्र कॅमेऱ्याच्या बारीक नजरेने प्रियंका यांच्या डोळे मारण्याचा क्षण कैद केला. मंडलाच्या रामनगरमध्ये मोती मैदानावर गुरूवारी काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांची सर्वसाधारण सभा होती. या सभेसाठी काँग्रेस अध्यक्ष कमलनाथ आणि प्रदेश प्रभारी रणदीप सुरजेवालासह पक्षाचे नेते आणि कार्यकर्तेही उपस्थित होते. मंडला आणि जवळपासच्या ठिकाणाहून मोठ्या संख्येने कार्यकर्ते आले होते.

सभेत बोलताना प्रियंका गांधी यांनी शिवराज सरकारवर हल्लाबोल केला तसेच जनतेला त्यांच्या कमतरता दाखवून दिल्या. त्या मंडला जबलपूर मार्ग नॅशनल हायवे ३० बाबत बोलत होत्या. त्या म्हणाल्या, मंडला-जबलपूर रोड गेल्या १० वर्षांपासून बनत आहे. आधी ४ लेनचा हा रोड बनत होता मात्र आता २ लेनचा बनत आहे. मात्र शिवराज सरकारला अद्याप बनवता आलेला नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -