Friday, October 4, 2024
HomeदेशUttarakhand: पंतप्रधान मोदी आज उत्तराखंड दौऱ्यावर, आदि कैलाशचे घेणार दर्शन

Uttarakhand: पंतप्रधान मोदी आज उत्तराखंड दौऱ्यावर, आदि कैलाशचे घेणार दर्शन

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी(pm narendra modi) आज गुरूवारी एक दिवसाच्या उत्तराखंड(uttarakhand) दौऱ्यावर जात आहेत. येथे ते ४२०० कोटींची भेट देणार आहेत. सोबतच भोलेनाथाचे दर्शनही घेणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आधी पिथोरागढ येथे पोहोचून आदि कैलाशचे दर्शन घेतील. यानंतर जागेश्वर धामला जातील. पंतप्रधान येथे एक जनसभा संबोधित करणार आहेत.

पंतप्रधान सकाळी साडेनऊ वाजता पिथोरागढ जिल्ह्याच्या गुंजी गावात पोहोचतील तेथे ते स्थानिक लोकांशी बातचीत करतील. तेथे ते स्थानिक कला आणि उत्पादनांवर आधारित एक प्रदर्शनही पाहतील. तसेच लष्कर, भारत-तिबेट सीमा पोलीस आणि सीमा रस्ते संघटनाच्या कर्मचाऱ्यांशीही बातचीत करतील.

पंतप्रधानांची सोशल मीडियावर पोस्ट

पंतप्रधानांनी उत्तराखंड येण्याआधी गुरूवारी पोस्टमध्ये लिहिले की, देवभूमी उत्तराखंडमधील लोकांच्या कल्याणासाठी तसेच राज्याच्या विकासासाठी आमचे सरकार कटिबद्ध आहे. येथील विकासाला अधिक गती देण्यासाठी पिथोरागढ येथे अनेक योजनांचे लोकार्पण तसेच शिलान्यास केले जाईल. येथील गुंजी गावात लोकांशी संवाद साधण्याची संधी मिळेल. या दौऱ्यात अध्यात्मिक महत्त्वा असलेल्या पार्वती कुंड तसेच जागेश्वर धामचेही दर्शन तसेच पुजा केली जाईल.

पंतप्रधानांचा उत्तराखंड दौरा

पंतप्रधान दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास अल्मोडा येथे पोहोचतील तेथे जागेश्वर धामची पुजा अर्चना करून त्यांचा आशीर्वाद घेतील. ६२०० फूट उंचावर असलेल्या जागेश्वर धाममध्ये २२४ दगडांची मंदिर आहेत. यानंतर पंतप्रधान दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास पिथोरागढ येथे पोहोचतील. येथे ते ग्रामाण विकास, रस्ते, वीज, सिंचन, पिण्याचे पाणी, शिक्षण, आरोग्य आणि आपत्ती व्यवस्थापन या विषयाशी संबंधित ४२०० कोटी रूपयांच्या विविध उपाययोजनांचे उद्धाटन तसेच लोकार्पण आणि शिलान्यास करतील.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -