महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ २०२३ स्पर्धेचा निकाल जाहीर

Share

पारितोषिक वितरण आज रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे दुपारी ४ वाजता होणार

मुंबई : राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने घेण्यात आलेल्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते गुरुवार १२ ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे. अकोला येथील श्री खडकेश्वर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास प्रथम, सांगली जिल्ह्यातील तिरंगा गणेशोत्सव मंडळ (यशवंतनगर, विटा, ता. खानापूर) आणि तृतीय पुरस्कार पुणे जिल्ह्यातील मार्केट यार्ड मित्र मंडळ (मंचर आंबेगाव) यांना जाहीर झाला आहे. याशिवाय जिल्हानिहाय पारितोषिक विजेतेही जाहीर करण्यात आले आहेत.

राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळास रुपये ५ लाख, व्दितीय क्रमांकास रुपये २.५० लाख आणि तृतीय क्रमांकास रुपये १ लाख इतक्या रकमेचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. तर उर्वरित ४१ गणेशोत्सव मंडळांस राज्य शासनाकडून प्रत्येकी रुपये २५ हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी येथे दुपारी ४ वाजता हा पारितोषिक प्रदान समारंभ होणार असून खासदार राहुल शेवाळे आणि आमदार सदा सरवणकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यावेळी भैरी भवानी परफॉर्मिंग आर्टस् यांचे सादरीकरण असलेला गणराज रंगी नाचतो हा सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या प्रकल्प संचालक मीनल जोगळेकर यांनी केले आहे.

या स्पर्धेतील जिल्हानिहाय विजेते खालीलप्रमाणे आहेत…

मुंबई
१. ताराबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

२. पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळ

३. निकदवरी लेन सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

मुंबई उपनगर:
१. स्वप्नाक्षय मित्र मंडळ,
२. बर्वेनगर व भटवाडी सार्व. गणेशोत्सव मंडळ, घाटकोपर(प)
३. बाल मित्र कला मंडळ, विक्रोळी (प)

ठाणे :
१. श्रीरंग सहनिवास गणेशोत्सव मंडळ ठाणे
२. (विभागून) एकवीरा मित्रमंडळ ठाणे आणि रिव्हरवूड पार्क सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
३. शिवसम्राट मित्र मंडळ, ठाणे

पालघर: साईनगर विकास मंडळ, पालघर
रायगड: संत रोहिदास तरुण विकास मंडळ, ता. महाड
रत्नागिरी: जैतापूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, जैतापूर
सिंधुदुर्ग : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सलईवाडा, सावंतवाडी
पुणे : नवज्योत मित्रमंडळ ट्रस्ट, खडकी
उत्कर्ष तरुण मंडळ, चिंचवडगाव
सातारा: सार्वजनिक क्रीडा गणेशोत्सव मंडळ, सावली, ता. सातारा
कोल्हापूर: गणेश तरुण मंडळ, ढेंगेवाडी
सोलापूर: श्री जगदंबा गणेशोत्सव सांस्कृतिक आणि सामाजिक क्रीडा मंडळ, माढा
नाशिक: श्री प्रतिष्ठान मंडळ, नाशिक
धुळे: वंदे मातरम प्रतिष्ठान, देवपूर
जळगाव: जळगाव जनता बँक कर्मचारी गणेश मंडळ, जळगाव
नंदुरबार : क्षत्रीय माली नवयुवक गणेशोत्सव मंडळ, तळोदा
अहमदनगर : सुवर्णयुग तरुण मंडळ
छत्रपती संभाजीनगर : जय मराठा गणेश मंडळ, चिखलठाण
जालना : कारेश्वर गणेश मंडळ, देवगाव खवणे ता. मंठा, जि. जालना
हिंगोली : श्री सिद्धिविनायक सार्वजनिक गणेश मंडळ, एन टी सी, हिंगोली
परभणी : स्वराज्य गणेश मंडळ, देवनंदरा
धाराशिव : बाल हनुमान गणेश मंडळ, गवळी गल्ली, धाराशिव
नांदेड : अपरंपार गणेश मंडळ, नांदेड
बीड : जय किसान गणेश मंडळ, मठ गल्ली, किल्ले धारूर
लातूर : बाप्पा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, लातूर
नागपूर : शिवस्नेह गणेश उत्सव कमिटी
गडचिरोली लोकमान्य गणेश मंडळ, गडचिरोली
गोंदिया : सार्वजनिक बाळ गणेश मंडळ, बोडगाव
चंद्रपूर : सार्वजनिक गणेश मंडळ चंद्रपूर
वर्धा : बाळ गणेश उत्सव मंडळ, समुद्रपूर
भंडारा : हनुमान व्यायामशाळा गणेशोत्सव मंडळ, मोहगाव देवी, मोहाडी
अमरावती : श्री बजरंग गणेशोत्सव मंडळ
बुलढाणा : भक्ती गणेश महिला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, बुलढाणा व सहकार्य फाऊंडेशन क्रीडा व बहु. संस्था, चिखली (विभागून)
वाशीम : मंत्री पार्क गणेशोत्सव मंडळ वाशीम
यवतमाळ : रिद्धी सिद्धी गणेश मंडळ

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Recent Posts

एलईडी मासेमारी पूर्णतः बंद करा; आमदार नितेश राणे विधानसभेत आक्रमक

मोठ्या रक्कमेचा दंड आणि शिक्षा होईल अशा पद्धतीचे कायदे अमलात आणा आमदार नितेश राणेंच्या मागणी…

30 mins ago

नार्वेकरांमुळेच काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांचा होणार पराभव

शिवसेनेच्या प्रताप सरनाईकांनी वर्तविले भाकीत मुंबई : ठाकरे गटाकडून मिलिंद नार्वेकर यांच्या नावाची विधानपरिषद निवडणुकीसाठी…

53 mins ago

मुंबईमध्ये पावसाळी साथीच्या आजारांचा ‘टक्का’ घसरला

गेल्या वर्षीच्या जूनच्या तुलनेत यंदा निम्म्याहून कमी प्रकरणे मुंबई : गेल्या वर्षीच्या जून महिन्याच्या तुलनेत…

56 mins ago

कारभार सुधारा अन्यथा कारवाई करू – नितीन गडकरी

पालघर : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या दुरावस्थेबाबत पालघरचे खा.हेमंत सवरा यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन…

60 mins ago

Skin Care Tips: झोपण्याआधी या गोष्टी चुकूनही खाऊ नाही, नाहीतर होईल स्किन इन्फेक्शन

मुंबई: जर तुम्हालाही तुमची त्वचा स्वस्थ ठेवायची असेल तर रात्री झोपण्याआधी काही गोष्टी चुकूनही खाल्ले…

1 hour ago

शेतकरी, ग्रामीण जनतेला अजितदादांचे बळ

अतिरिक्त अर्थसंकल्पात भरघोस निधी; विकासाचे नवे पर्व मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार…

1 hour ago