नवी दिल्ली: भारताने विश्वचषक २०२३च्या(world cup 2023) ९व्या सामन्यात अफगाणिस्तानला ८ विकेटनी हरवले. दिल्लीत खेळवण्यात आलेल्या या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्माने रेकॉर्डतोड शतक ठोकले. रोहितने सामन्यानंतर भारताच्या विजयाबद्दल प्रतिक्रिया दिली. त्याने दिल्लीची पिच आणि शतकाबाबतही बातचीत केली. रोहितने सांगितले की कधी कधी बॉलच्या हिशेबाने शॉट खेळतो आणि यासाठी आधीपासूनच तयार असतो. शतक ठोकल्यानंतर खुश आहे.
दिल्लीत विजयानंतर रोहित म्हणाला, पिच बॅटिंगसाठी सोपी होती. मला माहिती होते की विकेट सोपी होत जाईल. मी या गोष्टीने खुश आहे की प्लानच्या हिशेबाने सगळं काही झालं आणि शतक ठोकले. मी रेकॉर्डबाबत विचार करत नाही. आपला फोकस गमवायचा नसतो. आता रस्ता अजून खूप दूर आहे. मी कधी कधी शॉर्टबाबत आधी विचार करतो आणि बॉलच्या हिशेबाने खेळतो.
अफगाणिस्तानने पहिल्यांदा बॅटिंग करताना ८ बाद २७२ धावा केल्या होत्या. याच्या प्रत्युत्तरात भारताने ३५ षटकांतच हे आव्हान पूर्ण केले. रोहितने ८४ बॉलमध्ये १३१ धावा तडकावल्या. या खेळीत त्याने १६ चौकार आणि ५ षटकार ठोकले. इशान किशनचे अर्धशतक तीन धावांनी हुकले. त्याने ४७ बॉलमध्ये ४७ धावा केल्या. त्याने आपल्या या खेळी दरम्यान ५ चौकार आणि २ षटकार ठोकले.
विराट कोहली ५५ धावांवर नाबाद राहिला. त्याने ६ चौकार ठोकले. श्रेयस अय्यरनेही नाबाद २५ धावांची खेळी केली. त्याने एक चौकार आणि एक षटकार लगावला. टीम इंडियासाठी जसप्रीत बुमराहने ४ विकेट घेतल्या. हार्दिक पांड्याने २ विकेट घेतल्या. शार्दूल ठाकूर आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.