Sunday, July 7, 2024
Homeमहाराष्ट्रनाशिकचारा भरलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला भीषण आग

चारा भरलेल्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला भीषण आग

चाळीस हजाराचा कडबा जाळून खाक

नांदगाव : जनावरांचा चारा वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीला आग लागून चाळीस हजाराचा कडबा जाळून खाक झाला.

नांदगाव तालुक्यात पाणी टंचाईची परिस्थिती भीषण बनत चालली असून पावसाने पूर्ण पाठ फिरविल्याने आता ऐन पावसाळ्यात चाऱ्याच्या किंमती दुपटीने वाढू लागल्या आहेत. अजून काही दिवसांनी चारा मिळणेही मुश्किल होणार आहे. तालुक्यातील शेतकरी संकटात सापडला आहे. तालुक्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यातच नांदगाव तालुक्यातील पळाशी येथून चारा खरेदी करून मनमाड जवळील पाणेवाडीकडे जाणाऱ्या जनावरांचा चाऱ्यानी भरलेल्या ट्रॅक्टरला भीषण आग लागली. नांदगाव मनमाड रोडवर असलेल्या चालत्या ट्रॅक्टर मध्ये दोन एकरचा जनावरांसाठी चारा भरलेला दोन ट्रॉलीला अचानक आग लागल्याने चारा आगीत जळून खाक झाल्याची घटना घडली.

पाणेवाडी येथील शेतकरी भागा सांगळे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. आग कशामुळे लागली याचे कारण समजले नसून, येथील नागरिकांच्या मदतीने व येथील काही अंतरावरील निलेश सर्व्हिस स्टेशनवर ट्रॅक्टर थांबवून पाणी मारून आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. त्या नंतर नांदगाव नगर पालिकेचा मिनीबंब दाखल झाला. आग आटोक्यात आणण्यासाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी देखील प्रयत्न केले परंतु चारा जळून खाक झाला. अखेर कॉलेज जवळील पटांगणात चाऱ्याची टारली नेऊन जेसीबीच्या सहाय्याने खाली केली तरी देखील आग सुरूच होती यात सुमारे ४० हजाराचा कडबा चारा जळून खाक झाला, या दरम्यान नांदगांव पोलिसांनी जळालेल्या चाऱ्याची पाहणी केली.

“नांदगांव शहरा नजीक चालू ट्रॅक्टरच्या कडब्याला कुणीतरी आग लावल्याने चारा जळून खाक झाला यात माझे ४० हजार रुपयाचे आर्थीक नुकसान झाले आहे असे पाणेवाडी येथील शेतकरी भागा सांगळे यांनी सांगितले.”

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -