जयपूर: राजस्थानात(rajasthan) होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची(assembly election) तारीख बदलण्यात आली आहे. आधी २३ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. मात्र आता ही तारीख बदलून २५ नोव्हेंबर करण्यात आली आहे. दरम्यान, मतदान एकाच टप्प्यात होणार आहे. निवडणुकीचा निकाल ३ डिसेंबरला असेल.
भारत निवडणूक आयोगाने राजस्थानसह पाच राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली होती. राजस्थानात एकाच टप्प्यात निवडणूक होणार होती. त्यासाठी २३ नोव्हेंबर ही तारीख ठरवण्यात आली होती. मात्र तारखेची घोषणा केल्यानंतरर भारत निवडणूक आयोगाला विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनासह विविध मीडिया प्लॅटफॉर्मने निवडणुकीच्या तारखेबाबत आपले मत मांडले होते.
२३ नोव्हेंबरला देवोत्थान एकादशी
२३ नोव्हेंबला देवोत्थान एकादशी आहे. यामुळे मोठ्या संख्येने विवाह समारंभ तसेच मंगलकार्ये आणि धार्मिक उत्सव असतात. अशातच लोकांना असुविधा होईल. वाहनांची कमतरता होईल आणि याचा परिणाम मतदानावरही होऊ शकतो. या कारणामुळे राज्यातील अनेक सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक संघटनांनी आयोगाकडे तारीख बदलण्याबाबत विचारणा केली होती. आयोगाने यावर विचार केला आणि मतदानाच्या तारखेत बदल करत ती २३ नोव्हेंबरच्या जागी २५ नोव्हेंबर केली.
राजस्थानात ५.२५ कोटी मतदार
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार राजस्थानात ५.२५ कोटी मतदार आहेत. या ठिकाणी २.७३ कोटी पुरुष आणि २.५२ कोटी महिला मतदार आहेत. राजस्थानात कोणाचे सरकार बनणार हे ठवरण्यासाठी २२.०४ मतदांची भूमिका महत्त्वाची असेल जे पहिल्यांदा मतदान करतील.
कोणत्या राज्यात कधी होणार मतदान?
छत्तीसगडमध्ये ७ आणि १७ नोव्हेंबरला मतदान
मिझोरममध्ये ७ नोव्हेंबरला मतदान
तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबरला मतदान
राजस्थानात २५ नोव्हेंबरला मतदान
मध्य प्रदेशात १७ नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान