Sunday, August 10, 2025

Shivsena: शिवसेना पक्षचिन्ह आणि नाव, सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी

Shivsena: शिवसेना पक्षचिन्ह आणि नाव, सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी

नवी दिल्ली: शिवसेना(shivsena) हे नाव आणि पक्षचिन्ह एकनाथ शिंदे गटाला दिल्यानंतर त्याविरोधात उद्धव ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात(supreme court) महत्त्वाची सुनावणी होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटाने शिवसेनेतून बंड केल्यानंतर शिवसेना पक्ष तसेच त्याचे चिन्ह आपले असल्याचा दावा दोन्ही एकनाथ शिंदे गट तसेच उद्धव ठाकरे गटाने केला होता. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह दिले होते.


निवडणूक आयोगाच्या या निर्णयला उद्धव ठाकरे गटाने विरोध केला होता आणि त्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीत न्यायालय काय सांगते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्ह पुन्हा उद्धव ठाकरे गटाला मिळणार आहे का हे चित्रही स्पष्ट होईल.


याआधी १८ सप्टेंबरला सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेतली होती. त्यावेळेस तीन आठवड्यांनी सुनावणी घेऊ असे न्यायालयाने सांगितले होते. त्यामुळे आज ही महत्त्वाची सुनावणी होत आहे.


निवडणूक आयोगाने याआधी शिंदे गटाला शिवसेना हे नाव तसेच पक्षचिन्ह दिले होते. यावेळेस निवडणूक आयोगाने विधीमंडळातील आमदारांची संख्या तसेच २०१९मध्ये झालेल्या निवडणुकीती विजयी शिवसेना उमेदवारांच्या मतांची आकडेवारी ग्राह्य धरली होती. यानुसार निवडणूक आयोगाने हा निकाल दिला होता.

या निकालाविरोधात उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायलयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील निर्णयाकडे साऱ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
Comments
Add Comment