Thursday, May 8, 2025

क्रीडामहत्वाची बातमी

Rohit sharma: रोहित शर्माने वर्ल्डकपमध्ये बनवला शतकांचा रेकॉर्ड

Rohit sharma: रोहित शर्माने वर्ल्डकपमध्ये बनवला शतकांचा रेकॉर्ड

दिल्ली: भारताचा कर्णधार रोहित शर्माने(rohit sharma) एकदिवसीय विश्वचषक २०२३मध्ये इतिहास रचला आहे. त्याने एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत ७ शतके ठोकणारा जगातील पहिला क्रिकेटर बनला आहे. त्याने सचिन तेंडुलकरचाही रेकॉर्ड मोडला. सचिन तेंडुलकरच्या नावावर ६ शतकांचा रेकॉर्ड आहे.


यासोबतच रोहित विश्वचषकात सर्वात वेगवान एक हजार धावा करणारा संयुक्तरित्या पहिला फलंदाज ठरला आहे. रोहित आणि डेविड वॉर्नरने १९ डावांत एक हजार धावा केल्या आहेत.



वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक शतकांचा रेकॉर्ड


रोहित शर्मा - ७ शतके
सचिन तेंडुलकर - ६ शतके
रिकी पाँटिंग - ५ शतके
कुमार संगकारा - ५ शतके



वनडे शतकामध्ये रोहितने पॉटिंगचा रेकॉर्ड मोडला


वनडे शतकांच्या संख्येत भारताचा कर्णधार रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटर रिकी पॉटिंगचा रेकॉर्ड मोडला. वनडेमध्ये सर्वाधिक शतके सचिन तेंडुलकरच्या नावावर आहेत. त्यानंतर विराट कोहलीचा नंबर लागतो. रोहित शर्माच्या नावावर ३१ शतके आहेत. तर रिकी पॉटिंगच्या नावावर ३० शतके आहेत. श्रीलंकेचा माजी क्रिकेटर सनथ जयसूर्याच्या नावावर २८ शतके आहेत.


सचिन तेंडुलकर - ४९
विराट कोहली - ४७
रोहित शर्मा - ३१
रिकी पाँटिंग - ३०
सनथ जयसूर्या - २८

Comments
Add Comment