Sunday, July 14, 2024
Homeक्रीडाWorld Cup 2023World cup 2023: भारताचा अफगाणिस्तानवर धमाकेदार विजय

World cup 2023: भारताचा अफगाणिस्तानवर धमाकेदार विजय

नवी दिल्ली: रोहित शर्माच्या(rohit sharma) शानदार शतकी खेळीच्या जोरावर भारतीय संघाने विश्वचषक २०२३मध्ये(world cup 2023) अफगाणिस्तानवर धमाकेदार विजय मिळवला आहे. अफगाणिस्तानच्या संघाने विजयासाठी दिलेले २७३ धावांचे आव्हान भारतान ८ विकेट राखत पूर्ण केले.

भारताचा जबरदस्त फलंदाज विराट कोहलीने या सामन्यातही अर्धशतकी खेळी केली. त्याने धमाकेदार नाबाद ५५ धावा ठोकल्या. तर श्रेयस अय्यरने नाबाद २५ धावांची खेळी केली. याआधी भारताचा सलामीवीर रोहित शर्माने १३१ धावांची तडाखेबंद खेळी करत भारताच्या विजयाचा पारा रचला होता. इशान किशननेही या सामन्यात ४७ धावा ठोकल्या. त्याचे अर्धशतक तीन धावांनी हुकले. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात भारताचे दोनही सलामीवीर अपयशी ठरले होते. मात्र त्यांनी या सामन्यात ती चूक भरून काढली.

तत्पूर्वी, अफगाणिस्तानने पहिल्यांदा फलंदाजी करताना ५० षटकांत ८ बाद २७२ धावा केल्या होत्या. अफगाणिस्तानचा कर्णधार हश्मतुल्लाह शाहिदी याने ८० धावांची खेळी केली तर अझमतुल्लाह ओमरजाई याने ६२ धावांची खेळी केली. त्यामुळे संघाला अडीचशे पार धावसंख्या उभारता आली.

भारताकडून यावेळी जसप्रीत बुमराहने ४ विकेट घेतल्या. तर हार्दिक पांड्याने २ विकेट घेतल्या. शार्दूल ठाकूर आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

रोहित शर्माचा ऐतिहासिक रेकॉर्ड

रोहित शर्मा विश्वचषकात सर्वाधिक ७ शतके ठोकणारा पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने सचिन तेंडुलकरच्या ६ शतकांचा रेकॉर्ड मोडला. यासोबतच रोहित विश्वचषकात सर्वात वेगवान एक हजार धावा करणारा संयुक्तरित्या पहिला फलंदाज ठरला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

स्पंदन तारे

अनुभव

- Advertisment -