Saturday, July 20, 2024
Homeक्रीडाWorld Cup 2023Virat Kohli: 'किंग कोहलीच्या ५०व्या वनडे शतकानंतरच लग्न करेन', चाहत्याचे पोस्टर व्हायरल

Virat Kohli: ‘किंग कोहलीच्या ५०व्या वनडे शतकानंतरच लग्न करेन’, चाहत्याचे पोस्टर व्हायरल

मुंबई: विराट कोहली(virat kohli) क्रिकेट जगतात सर्वाधित आंतरराष्ट्रीय शतक ठोकणारा दुसरा फलंदाज आहे. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत ७७ शतके निघाली आहेत. यात त्याने ४७ वनडेत २९ कसोटीत आणि टी-२० मध्ये १ शतक ठोकले आहे. आता सोशल मीडियावर त्याच्या एका चाहत्याचे पोस्टर व्हायरल होत आहे. या पोस्टवर चाहत्याने लिहिले की किंग कोहलीचे ५० वनडे शतक पूर्ण झाल्यानंतरच लग्न करेन. कोहली वनडेत सर्वाधिक शतके ठोकणारा दुसरा फलंदाज आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक १०० शतके भारताचा माजी दिग्गज क्रिकेट सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. तर सर्वाधिक ४९ वनडे शतकांचा रेकॉर्डही सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. अशातच कोहली वनडेत केवळ ३ शतके ठोकून दिग्गज तेंडुलकरचा रेकॉर्ड तोडू शकतो. विराटचे पोस्टर घेतलेला हा चाहता भारत आणि अफगाणिस्तानच्या सामन्यादरम्यान दिसला.

 

वर्ल्डकपमध्येच पूर्ण करू शकतो ५० वनडे शतक

वर्ल्डकपमध्ये सर्व संघ ९-९ लीग सामने खेळणार आहेत. लीग सामन्यात कोहली अगदी सहज ३ शतके ठोरत आपली ५० वनडे शतक पूर्ण करून सचिन तेंडुलकरचा रेकॉर्ड तोडू शकतो. स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळवण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात कोहलीने ८५ धावांची खेळी केली होती. धावांचा पाठलाग करताना कोहलीला शतक पूर्ण करता आले नव्हते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -