Thursday, July 25, 2024
Homeताज्या घडामोडीIsrael : इस्त्रायलच्या मदतीसाठी अमेरिकेने घेतला मोठा निर्णय

Israel : इस्त्रायलच्या मदतीसाठी अमेरिकेने घेतला मोठा निर्णय

नवी दिल्ली: गेल्या चार दिवसांपासून इस्त्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धात अमेरिकेने सरळ एंट्री घेत असल्याचे दिसत आहे. असे यासाठी कारण मंगळवारी रात्री उशिरा दारूगोळ्याने भरलेले एक अमेरिकन विमान इस्त्रायलला पोहोचले आहे.

एजन्सीच्या माहितीनुसार हत्यारे नेआण करणाऱ्या अमेरिकेच्या विमान हायटेक दारूगोळा आहे. मंगळवारी संध्याकाळी हे विमान अमेरिकेतून निघून रात्री उशिरा इस्त्रायलच्या नेबातिम विमानतळावर उतरले. अमेरिकेने हा दारूगोळा अशा वेळेसाठी पाठवला आहे जेव्हा युद्ध निर्णायक वळणावर पोहोचेल.

 

याआधी आतापर्यंत अमेरिकेने या युद्धात इस्त्रायलला समर्थन दिले होते. मात्र दाररू गोळा पुरवठा सुरू केला नव्हता. आता मानले जात आहे यानंतरही अनेक अमेरिकन विमाने दारूगोळा घेऊन इस्त्रायलला पोहोचू शकतात. यातच परराष्ट्र मंत्री एंटनी ब्लिंकन आज ११ ऑक्टोबरला इस्त्रायल दौऱ्यावर पोहोचू शकतात.

बायडेन यांचे समर्थन

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनीही इस्त्रायलला पूर्णपणे पाठिंबा दर्शवला आहे. त्यांनी मंगळवारी रात्री उशिरा प्रेस कॉन्फरन्स घेत सांगितले होते की अमेरिका इस्त्रायलसोबत आहे. इस्त्रायलमध्ये हजारो लोकांची हत्या झाली. तरुणांचा नरसंहार करण्यात आला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -