नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(pm narendra modi) होंगझाऊ येथील आशियाई स्पर्धेत भाग घेऊन परतलेल्या भारतीय चमूची मंगळवारी मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियममध्ये भेट घेतली. आशियाई स्पर्धेतील भारताची ही आतापर्यंतची जबरदस्त कामगिरी असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
भारतीय खेळाडूंच्या चमूला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले, आज जेव्हा तुम्ही यशस्वी होऊन आला आहात तेव्हा मला वाटत आहे की आम्ही योग्य दिशेला आहोत. परदेशी भूमीवर सर्वाधिक मेडल भारताने यावेळेस जिंकले आहेत.
पंतप्रधान मोदी म्हणाले, मला गर्व आहे की आमच्या नारी शक्तीने आशियाई स्पर्धेत चांगली कामगिरी केली. यामुळे भारताच्या मुलींचे सामर्थ्य पाहायला मिळते. पंतप्रधान खेळाडूंना म्हणाले, मेडलची संख्या शतकीपार करण्यासाठी तुम्ही दिवस-रात्र एक केला. आशियाई स्पर्धेत तुमच्या कामगिरीने संपूर्ण देशाला गर्व वाटत आहे.
पंतप्रधान मोदी म्हणाले, यावेळेस पदक तालिकेत कमी वयाच्या अनेक खेळाडूंनी आपले स्थान बनवले. जेव्हा कमी वयाचे खेळाडू इतकी मोठी उंची गाठतात तेव्हा ते आपल्या खेळाची राष्ट्रीय ओळख बनतात. मी त्यांचे डबल कौतुक करतो. ते पुढे म्हणाले, आपण जितक्या खेळांमध्ये भाग घेतला आहे त्यात कोणते ना कोणते पदक आलेच आहे. २० खेळ असे होते ज्यात आतापर्यंत देशाला पोडियम फिनिशही मिळाली नव्हती. अनेक खेळांमध्ये तुम्ही नवा रस्ता खोलला आहे.
भारताने होंगझाऊ येथे झालेल्या आशियाई स्पर्धेत २८ सुवर्णपदकांसह १०७ पदके जिंकली आहेत. या १०७ पदकांसह भारत पदक तालिकेत चौथ्या स्थानी राहिला. आशियाई स्पर्धेतील भारताचे आतापर्यंतचे हे सर्वोत्कृष्ट प्रदर्शन आहे.