सुप्रिया सुळे यांची पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादी प्रवेशाची ऑफर ?
पाथर्डी (दादासाहेब खेडकर) – पंकजा मुंडे म्हणजे एक लढाऊ महिला आहेत. पंकजा मुंडे या एकट्या लढते आहेत,राज्यात गोपीनाथ मुंडे व प्रमोद महाजन, एकनाथ खडसे, पांडुरंग फुंडकर अण्णा डांगे, ना.स.फरांदे यांनी पक्ष रुजवला त्याच पक्षाकडून दोघांच्या मुलींना पंकजा मुंडे आणि पूनम महाजन यांना कशी वागणूक दिली जात आहे.
गोपीनाथ मुंडे यांनी शून्यातून विश्व निर्माण केले मुंडे महाजन या मराठमोळ्या राजबिंड व्यक्तिमत्वांनी दिल्ली गाजवली. भाजपला त्यांच्या योगदानाचा विसर पडला असेल परंतु मी त्यांची बहीण म्हणून राजकारणाच्या पलीकडे जाऊन पंकजा मुंडे यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादी पक्ष प्रवेशाचे आवाहन केले.
पाथर्डी येथे संस्कार भवनमध्ये प्रताप ढाकणे व आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या पुढाकाराने सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत परिसंवाद यात्रेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष रोहीणी खडसे, मेहबूब शेख,जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके,शिवशंकर राजळे,संदिप वर्पे,चंद्रकांत म्हस्के,योगिता राजळे,कल्याण नेमाणे,शारदा लगड,अभिषेक कळमकर,सविता भापकर,रत्नमाला उदमले इत्यादी पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
खासदार सुप्रिया सुळे यांनी मोहटादेवी गडावर जाऊन दर्शन घेतले. सुप्रिया सुळे यांनी आपल्या भाषणात पंकजा मुंडे यांचा या भागावर अधिक प्रभाव असल्याचे त्यांनी भाषणातून आवर्जून सांगितले. पुढे बोलताना सुप्रिया सुळे यांनी सरकारवर ताशेरे ओढले,राज्य सरकारने घेतलेल्या सत्तेवर कंत्राटी कामगारांच्या आदेशाची होळी करू,बंद केलेल्या शाळा पुन्हा सुरु करुन एक जरी शाळा बंद केली तर तीव्र विरोध करू,दारू दुकानांऐवजी शाळा वाढवणारे सरकार देऊ,त्यांच्याकडे पक्ष फोडायला घरे फोडायला पैसे आहेत,पण नांदेडच्या रुग्णालयात औषधे दयायला पैसे नाहीत,भाजपामध्ये एक अदृष्य शक्ती आहे जी पक्ष फोडते,राष्ट्रवादी कॉंग्रेसला अडचणीत आणते,त्याच शक्तीने देवेंद्र फडणविसांना सुध्दा मुख्यमंत्र्यांचे उपमुख्यमंत्री व त्यातही पुन्हा हाफ उपमुख्यमंत्री केले असा टोला लगावला. ऊसतोडणी मजूर कामगार संपासंबंधी यापुर्वी पंकजा मुंडे यांनी वेळोवेळी शरद पवार यांच्याशी चर्चा केली आहे पक्षीय विचार वेगळे असले तरी कामगार हिताबाबत त्यांची तळमळ होती,पवार कुटुंबाने नेहमीच पंकजा मुंडे यांचा सन्मान राखण्याचा प्रयत्न केला आहे.