Thursday, July 3, 2025

World Cup 2023: विश्वचषकादरम्यान भारतीय संघाचे टेन्शन वाढले

World Cup 2023: विश्वचषकादरम्यान भारतीय संघाचे टेन्शन वाढले

चेन्नई: भारताचा स्टार सलामीवीर शुभमन गिल डेंग्यूमुळे अफगाणिस्तानविरुद्ध बुधवारी खेळवल्या जाणाऱ्या सामन्यात खेळणार नाही. दरम्यान, शुभमन गिल शनिवारी पाकिस्तानविरुद्धच्या महामुकाबल्यातही मैदानात उतरणार की नाही याची शक्यता कमीच आहे.


यावर्षी भारतासाठी एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा शुभमन गिल न खेळणे हे टीम इंडियाचे टेन्शन वाढवणारे आहे. रविवारी भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यातून या विश्वचषकाच्या अभियानाची सुरूवात केली. ऑस्ट्रेलियाच्या संघाला १९९ वर बाद केल्यानंतर एक वेळ अशी आली होती की टीम इंडिया सामना गमावताना दिसली होती.


ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने २ धावांवर तीन गडी गमावले होते. त्यावेळेस टीम इंडियामध्ये शुभमन गिलची अनुपस्थिती जाणवली.


शुभमन गिलची तब्येत गेल्या आठवड्यात खराब झाली होती. त्याला डेंग्यू झाला आहे. इंग्रजी वेबसाईटच्या बातमीनुसार शुभमन गिल ७० टक्के बरा झाला आहे. मात्र असे असले तरी त्याच्या पुनरागमनाबाबत काहीच सांगितले जाऊ शकत नाही. डेंग्यूमधून पूर्णपणे बरे होण्यास दोन आठवड्यापेक्षा जास्त कालावधी लागू शकतो. दरम्यान, सध्या गिल चेन्नईत उपचार करत आहे. अफगाणिस्तानच्या सामन्यात तो खेळणार नाही आहे.

Comments
Add Comment