Sunday, April 27, 2025
Homeताज्या घडामोडीशिपिंग, लॉजिस्टिक क्षेत्रातील उद्योग वृद्धीसाठी सहकार्यात महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर राहील – उपमुख्यमंत्री...

शिपिंग, लॉजिस्टिक क्षेत्रातील उद्योग वृद्धीसाठी सहकार्यात महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर राहील – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मित्सुई ओ.एस.के.लाइन्सच्या प्रतिनिधी मंडळाने घेतली उपमुख्यमंत्री फडणवीस यांची सदिच्छा भेट

मुंबई : दळण-वळणाच्या दृष्टीने भारत भौगोलिकदृष्ट्या सुस्थापित असून जगासाठी लॉजिस्टिक्स हब ठरण्याची क्षमताही आहे. या पार्श्वभूमीवर शिपिंग आणि लॉजिस्टिक क्षेत्रातील उद्योग वृद्धीसाठी सहकार्य करण्यात महाराष्ट्र नेहमीच आघाडीवर राहील, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

मित्सुई ओएसके लाईन्स लि. च्या प्रतिनिधी मंडळाने उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी संचालक ज्युनिचिरो ईकेडा, मासारु ओनिशी, दक्षिण आशिया आणि मध्यपूर्व भागाचे प्रभारी अजय सिंग, कॅप्टन आनंद जयरामन, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी हे उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, देशात विविध क्षेत्रात झपाट्याने विकास होत आहे. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. थेट परकीय गुंतवणुकीत राज्य पहिल्या क्रमांकावर आहे. ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रातही राज्य अग्रेसर आहे. पुण्यात इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टरची उभारणी करण्यात येत असून राज्यात सर्वच क्षेत्रात भक्कम पायाभूत सुविधांच्या उभारणीचे काम वेगाने सुरू असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

शिपिंग आणि लॉजिस्टिक क्षेत्रातील उद्योग वृद्धीसाठी सर्व आवश्यक सहकार्य करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

शिपिंग आणि लॉजिस्टिक क्षेत्रासाठी आवश्यक इको सिस्टिम महाराष्ट्रात उपलब्ध आहे. कंपनीमार्फत या क्षेत्रातील करिअरसाठी प्रशिक्षण व कौशल्य विकास कार्यक्रमही घेण्यात येतात अशी माहिती मित्सुई ओ.एस.के. लाईन्सच्या प्रतिनिधी मंडळाने यावेळी दिली.

मित्सुई ओ.एस.के. लाइन्स ग्रुप जगभरात दैनंदिन जीवनाला आणि उद्योगांना आधार देणारी संसाधने, ऊर्जा, कच्चा माल आणि तयार उत्पादनांसह विविध वस्तूंची सुरक्षित आणि स्थिर वाहतूक सेवा उपलब्ध करून देत आहे. विविध उद्योगांमध्ये मल्टीमोडल ओशन शिपिंग कंपनी म्हणून आघाडीवर आहे. एमओएल समूह आपल्या ग्राहकांच्या आणि मोठ्या प्रमाणावर समाजाच्या गरजा आणि मागणीनुसार शाश्वत आणि धोरणात्मक उपक्रम राबवत असल्याचे प्रतिनिधी मंडळातील सदस्यांनी सांगितले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -