मुंबई: अकेली फेम अभिनेत्री नुसरत भरूचा(nusrat bharucha गेल्या काही दिवसांपासून इस्त्रायलमध्ये अडकल्याने चर्चेत होती. नुसरत इस्त्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे इस्त्रायलमध्ये अडकली होती. ती ८ ऑक्टोबरला आपल्या देशात सुरक्षितपणे भारतात परतली. अभिनेत्रीला एअरपोर्टवर दिसली. या दरम्यान ती भावनिक दिसली. आता भारतात परतल्यानंतर दोन दिवसांनी तिने आपली प्रतिक्रिया दिली आहे.
नुसरतने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओच्या सुरूवातीला नुसरतने इस्त्रायलमध्ये अडकलेली असताना तिच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त करत तिची आठवण काढणाऱ्या, तिला मेसेज करणाऱ्या आणि तिच्यासाठी प्रार्थना करणाऱ्या लोकांचे आभार मानले.
नुसरतने सांगितले की तेल अवीवमध्ये बॉम्ब हल्ला आणि सायरनचे आवाज ऐकून ती खूप त्रस्त झाली होती. आपल्या बचावासाठी ते एका बेसमेंटमध्ये राहिले होते. भारतात परतल्यानंतर तिला वाटले की आपण किती नशीबवान आहोत की आपल्या देशात आपण किती सुरक्षित आणि शांततेत जगत आहोत.
View this post on Instagram
नुसरत म्हणाली, मी भारतात परतले आहे. सुरक्षित आहे. ठीक आहे. मात्र दोन दिवसांआधी हॉटेल रूममध्ये होते आणि जेव्हा मी झोपून उठले तेव्हा चारही बाजूला बॉम्बचे आवाज येत होते. त्यानंतर आम्हाला बेसमेंटला आणण्यात आले. मी अशा परिस्थितीत कधीच अडकले नव्हते. मात्र आज मी जेव्हा घरात उठले आणि स्वत:ला सुरक्षित वाटते आहे. मला असे वाटते की ही किती मोठी बाब आहे की आपण किती नशीबवान आहोत की आपण या देशात आहोत. आपण सुरक्षित आहोत.
याशिवाय नुसरतने आपल्या सुरक्षित भारतात परतण्याबद्दल भारत सरकार, भारतीय आणि इस्त्रायलच्या दूतावासाचे आभार मानले. तसेच लवकरात लवकर शांती प्रस्थापित होईल अशी आशा व्यक्त केली.