
नवी मुंबई : गौतमी पाटील (Gautami Patil) हिच्या नवी मुंबईत झालेल्या कार्यक्रमात आधी एक साप घुसल्याने मोठा गोंधळ उडाला होता. एका सर्पमित्राने सापाला पकडल्याने कार्यक्रम पुढे सुरु झाला. तिच्या कार्यक्रमासाठी नेहमीप्रमाणे तुफान गर्दी झाली होती. त्यात काही टवाळखोर तरुणांनी धिंगाणा घातला. कार्यक्रमात काही उत्साही प्रेक्षकांनी खुर्च्यांची तोडफोड केली. यामुळे गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचा धाक दाखवावा लागला.
नवी मुंबईतील कामोठे परिसरात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रवादीचे संघटक राजकुमार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवला होता. या कार्यक्रमाला तरुणांनी तुफान गर्दी केली आणि धिंगाणा घातला.
दरम्यान, गौतमीच्या कार्यक्रमामुळे गोंधळ होत असल्याने काही ठिकाणी गौतमीचे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. काहींनी या घटनेबाबत नाराजी व्यक्त केली आहे.