
बंगळुरू : मेट्रोमध्ये गोबी मंचुरियन (Manchurian) खाणा-या तरुणाविरोधात बंगळुरू मेट्रोने (Bengaluru Metro) ५०० रुपये दंड ठोठावला असून न्यायालयीन खटला दाखल केला आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती मेट्रोमध्ये कोबी मंचुरियन खाताना दिसत आहे. त्याचे मित्र त्याला तसे करण्यास मनाई करत होते, पण तो मान्य करत नव्हता. बंगळुरू मेट्रोने त्याला ५०० रुपयांचा दंड ठोठावला आणि जयनगर पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. आता या व्यक्तीला पैसे भरावे लागणार असून खटला सुद्धा लढवावा लागणार आहे.
या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.
This was the video he had circulated earlier on social media which got hin into trouble pic.twitter.com/UQ8lnFExft
— S. Lalitha (@Lolita_TNIE) October 5, 2023
मेट्रोमध्ये वीरता दाखवू नका अन्यथा अशीच कारवाई केली जाईल, असे एका यूजरने लिहिले आहे. एका युजरने म्हटले की, बातम्यांमध्ये राहण्यासाठी कायदा मोडणाऱ्या अशा गोष्टी करू नका. लोलिता नावाच्या युजरने X वर हा व्हिडिओ शेअर केला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या व्यक्तीचे नाव सुनील कुमार आहे. तो जयनगर येथील एका दागिन्यांच्या दुकानात काम करतो. मल्लेश्वरममधील सॅम्पीगे रोड स्टेशनवर हा व्यक्ती दररोज मेट्रोमध्ये चढत असे.