
दीपक केसरकरांचा टोला
मुंबई : ठाकरे गटाचे (Thackeray Group) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे नेहमीच अतर्क्य विधाने करत असतात. आज शिवसेनेचे मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्यावर राऊतांनी टीका केली. केसरकर हे सावंतवाडीच्या मोती तलावातला डोमकावळा असल्याची टीका त्यांनी केली. तसेच संजय राऊतांनी केसरकरांच्या पक्षबदलावर टीका केली. यावर केसरकरांनीही जोरदार प्रत्युत्तर देत राऊतांना तोंडावर पाडले आहे.
दीपक केसरकर म्हणाले, मी कोकणामध्ये वैचारिक संघर्ष केला. वैचारिक भूमिकेतून मी राष्ट्रवादीचा राजीनामा दिला होता. वैचारिक संघर्ष संजय राऊतांच्या आसपासची गोष्ट नाही आहे, असा टोला केसरकरांनी हाणला आहे. याचबरोबर नारायण राणे (Narayan Rane) आणि माझे अतिशय चांगले संबंध आहेत. तेव्हा संजय राऊतांची सिंधुदुर्गमध्ये येण्याची हिंमतही नव्हती, असे केसरकर म्हणाले आहेत.
यंदाचा शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर न होता तो क्रॉस किंवा ओव्हल मैदानावर घेण्यात येईल, अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली होती. शिवसेनेने यातून मनाचा मोठेपणा दाखवला होता. मात्र, त्यातही संजय राऊतांनी राजकारण करत केसरकरांवर टीका केली. त्यामुळे केसरकरांनीही आता त्यांना चांगलीच चपराक लगावली आहे.