Friday, July 19, 2024
Homeमहत्वाची बातमीMahayuti government : मंत्रिमंडळाच्या बैठकीत महायुती सरकारचे ७ महत्त्वपूर्ण व धाडसी निर्णय

Mahayuti government : मंत्रिमंडळाच्या बैठकीत महायुती सरकारचे ७ महत्त्वपूर्ण व धाडसी निर्णय

लेक लाडकी योजनेंतर्गत मुलींना लखपती करणार तर जलविद्युत प्रकल्पासाठी धोरण तसेच शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय…

मुंबई : राज्य सरकारच्या (Maharashtra Government) मंत्रिमडळाची आज मंत्रालयात बैठक पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत घेण्यात आलेल्या या बैठकीत राज्यातील अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. महिला आणि बालविकास विभाग, जलसंपदा विभाग, महसूल विभाग अशा अनेक विभागांचा या बैठकीत आढावा घेण्यात आला.

सीएमओ ऑफिसच्या वतीनं मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयांसंदर्भात एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. तसेच, यासह मंत्रिमंडळात घेण्यात आलेल्या ७ निर्णयांची माहिती दिली आहे. यावेळी मुलींना लखपती करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला. तसेच फलटण ते पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग आता रेल्वे मंत्रालयातर्फे पूर्ण करणार असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली.

कोणते ७ महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले?

महिला आणि बालविकास विभाग : राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी योजना राबवणार. मुलींना लखपती करणार.

जलसंपदा विभाग : सार्वजनिक खासगी भागीदारीतून उदंचन जलविद्युत प्रकल्पासाठी धोरण राबवण्यात येणार आहे. मोठ्या प्रमाणावर खासगी गुंतवणूक जलविद्युतमध्ये येणार.

विधि आणि न्याय विभाग : सांगली, अहमदनगर जिल्ह्यात जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालये उभारणार.

महसूल विभाग : पात्र माजी खंडकरी शेतकऱ्यांना १ एकरापेक्षा कमी जमीन मिळणार.

परिवहन विभाग : फलटण ते पंढरपूर नवीन ब्रॉडगेज रेल्वेमार्ग आता रेल्वे मंत्रालयातर्फे पूर्ण करणार.

महसूल आणि वन विभाग : भोसला मिलिटरी स्कूलला नागपूर येथे जमीन देणार.

उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग : विद्यापीठाच्या नावात औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर बदल करण्यास मान्यता देणार.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -