Tuesday, July 1, 2025

World Cup: शुभमन गिल दुसऱ्या सामन्यातूनही बाहेर, टीमसोबत दिल्लीला गेला नाही

World Cup: शुभमन गिल दुसऱ्या सामन्यातूनही बाहेर, टीमसोबत दिल्लीला गेला नाही

मुंबई: टीम इंडियाने विजयासह जोरदार सुरूवात केली आहे. भारताने आपल्या पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला हरवले होते. सामन्यात सलामीवीर शुभमन गिल(shubman gill) खेळला नव्हता. त्याला ताप होता. आता तो दुसऱ्या सामन्यातूनही बाहेर झाला आहे. बीसीसीआयने याची माहिती दिली. भारताचा दुसरा सामना ११ ऑक्टोबरला दिल्लीच्या अरूण जेटलीमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध होणार आहे.


भारतीय संघ चेन्नईवरून दिल्लीसाठी रवाना झाला आहे आणि गिल अद्यापही चेन्नईमध्येच आहे. मेडिकल टीम गिलच्या तब्येतीवर लक्ष ठेवून आहे.ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या सामन्यात गिलच्या जागी इशान किशनने सलामीवीराची भूमिका निभावली होती. मात्र त्याला खातेही खोलता आले नव्हते. ऑस्ट्रेलियाविरुद्ध विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने अर्धशतक ठोकले होते.


शुभमन गिलच्या तब्येतीबाबत बीसीसीआयने सांगितले की शुभमन गिल टीमसोबत ९ ऑक्टोबरला दिल्लीा जाणार नाही. तो पहिल्या सामन्यानंतर अफगाणिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातही खेळू शकणार नाही. तो चेन्नईत राहील आणि मेडिकल टीम त्यांची देखभाल करेल. गिलने सलामीवीर म्हणून २०२३मध्ये आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. त्याने द्विशतकही ठोकले आहे.


आशिया चषक स्पर्धेतही गिलने शतकी खेळी केली होती. काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतही त्याने कमाल कामगिरी केली होती. शुभमन गिलच्या अनुपस्थितीत इशान किशनला विश्वचषकातील पहिला सामना खेळण्याची संधी मिळाली मात्र तो शून्य धावा करून बाद झाला.

Comments
Add Comment