Wednesday, July 3, 2024
Homeताज्या घडामोडी'इंडिया'ला अलविदा म्हणत हमासविरुद्ध लढण्यासाठी या पत्रकाराने उचलले हत्यार!

‘इंडिया’ला अलविदा म्हणत हमासविरुद्ध लढण्यासाठी या पत्रकाराने उचलले हत्यार!

नवी दिल्ली: इस्त्रायल(israel) आणि फिलिस्तानची(palestine) दहशतवादी संघटना हमास(hamas) यांच्यात युद्ध सुरू आहे. इस्त्रायलच्या अनेक भागांमध्ये आताही दहशतवादी संघटनेकडून रॉकेट सोडले जात आहेत. अनेक ठिकाणी दहशतवादी आणि इस्त्रायलचे लष्कर यांच्यात संघर्ष सुरू आहे. सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांमुळे इस्त्रायलमधील अनेक घरे उद्ध्वस्त झाली आहेत. लोकांना आपला जीव वाचवण्यासाठी बंकरमध्ये लपावे लागत आहे.

अशातच एका इस्त्रायलच्या पत्रकाराने ट्वीट करत इंडियाला अलविदा म्हटले आहे. त्याचे हे ट्वीट खूप व्हायरल होत आहे. त्याने ट्वीट केले, मला आपला देश इस्त्रायलची सेवा आणि रक्षा करण्यासाठी नियुक्त करण्यात आले आहे. मी आपली पत्नी इंडियाला अलविदा म्हटले. तिने मला देवाचा आशीर्वाद आणि सुरक्षेसह पाठवले आहे. आता ती माझ्या वतीने ट्विटरवर पोस्टिंग करेल यामुळे तिच्यासोबत नीट वागणूक ठेवा.

हमासच्या हल्ल्यात ७०० हून अधिक इस्त्रायल नागरिकांचा मृत्यू

दहशतवादी संघटना हमासने इस्त्रायलवर ५ हजाराहून अधिक रॉकेट टाकले होते. या हल्ल्यात इस्त्रायलमधील ७००हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी युद्धाची घोषणा केली आणि यानंतर इस्त्रायलनेही गाझा पट्टीमध्ये हमासच्या ठिकाणांवर बॉम्ब हल्ला केला आहे. यात हमासच्या ८००हून अधिक ठिकाणे उद्ध्वस्त झाली आहेत. तर ४००हून अधिक लोक मारले गेलेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -