मुंबई : वर्षभरात मानवतेसाठी मोलाचं कार्य करणाऱ्यांना नोबेल पुरस्कारांनी (Nobel Prizes) गौरविण्यात येतं. जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा असलेला नोबेल पुरस्कार प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींना जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या सोमवारी वैद्यकीय क्षेत्रातील विजेत्याची घोषणा करून नोबेल पुरस्काराचे उद्घाटन करण्यात आले. तर आज अर्थशास्त्र क्षेत्रातील नोबेल पुरस्कार २०२३ च्या (Nobel Prize in Economics 2023) विजेत्याची घोषणा करण्यात आली आहे. क्लॉडिया गोल्डिन (Claudia Goldin) यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. रॉयल स्वीडिश अॅकॅडमी ऑफ सायन्सेसने (Royal Swedish Academy of Sciences) त्यांची निवड केली आहे.
गोल्डीन यांनी महिला श्रमिक बाजार क्षेत्रात काम केले आहे. सध्या त्या हार्वर्ड विद्यापीठातील अर्थशास्त्राच्या प्राध्यापिका आहेत. १९८९ ते २०१७ या काळात त्या NBER च्या डेव्हलपमेंट ऑफ यूएस इकॉनॉमी प्रोग्रामच्या संचालक होत्या. एक आर्थिक इतिहासकार आणि कामगार अर्थशास्त्रज्ञ म्हणून, गोल्डिन यांनी केलेल्या संशोधनामध्ये महिलांची श्रम शक्ती, कमाईतील लिंग अंतर, उत्पन्न असमानता, तांत्रिक बदल, शिक्षण आणि इमिग्रेशन यांसह विविध विषयांच्या अभ्यासाचा समावेश आहे. त्यांनी केलेले बरचसे संशोधन हे भूतकाळाच्या दृष्टीकोनातून वर्तनमानाचा अर्थ लावते. त्यांनी रिअर अँड फॅमिली, अ सेंच्युरी ऑफ वुमन – द लाँग जर्नी टूवर्ड इक्विटी ही पुस्तके लिहिली आहेत.
अमेरिकन अर्थव्यवस्थेतील महिलांवरील महत्त्वपूर्ण कामासाठी गोल्डीन ओळखल्या जातात. त्यांना विशेषतः श्रमिक बाजारपेठेतील महिलांवरील संशोधनासाठी आज अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक जाहीर करण्यात आले. नोबेल समितीने म्हटले की, गोल्डीन यांच्या संशोधनातून अर्थव्यवस्थेतील लैंगिक अंतराबाबत माहिती मिळते. नोबेल समितीने पारितोषिकाच्या घोषणेदरम्यान सांगितले की, गोल्डीन यांच्या संशोधनाने महिलांचे उत्पन्न आणि श्रमिक बाजारातील इतिहासाचा परिणाम यांचा सर्वसमावेशक लेखाजोखा उपलब्ध करून दिला आहे.
गोल्डिन यांना अल्फ्रेड नोबेलच्या स्मरणार्थ २०२३ चा अर्थशास्त्रातील Sveriges Riksbank पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. या पुरस्कार विजेत्याला १० दशलक्ष स्वीडिश क्रोना म्हणजे सुमारे नऊ लाख सात हजार डॉलर्स दिले जातात. गेल्या वर्षीचा पुरस्कार यूएसस्थित अर्थशास्त्रज्ञ बेन बर्नान्के, डग्लस डायमंड आणि फिलिप डायबविग यांना त्यांच्या बँका आणि आर्थिक संकटांवरील कार्यासाठी देण्यात आला होता.
मुंबई(ज्ञानेश सावंत):सुरवातीच्या सामन्यात चेन्नईने मुंबईला फिरकीच्या जोरावर पराभवाचे पाणी पाजले. परंतु तो सामना चेन्नईच्या घरच्या…
पूजा काळे सृष्टीचे तत्त्व सांभाळा, नेहमीची येतो उन्हाळा. वर्षभरात तीन ऋतूंच्या तीन तऱ्हा सांभाळताना होणारा…
पुणे : काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात अध्यक्ष बदलला आहे. हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष झाले आहेत.…
डॉ. वीणा सानेकर भाषा हा शिक्षणातील पायाभूत घटक आहे. ती माणसाच्या अस्तित्वाची ओळख असल्यामुळे शिक्षणातील…
अर्चना सोंडे जगात ज्या काही दुर्मीळ आदिवासी जमाती आहेत. ज्यांचे पृथ्वीवरील अस्तित्व संपल्यात जमा झाले…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण सप्तमी शके १९४७. चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा. योग सिद्ध. चंद्र राशी…