
नाशिक/मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई प्रदेशाध्यक्ष समीर भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी सोनचाफा पुष्पहार घालून दोन किलो चांदीची तलवार, शाल व पुष्पहार घालून भव्य सत्कार केला.
माजी खासदार समीर भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वसामान्य नागरिकांपासून ते राष्ट्रीय स्तरावरील प्रमुख नेत्यांनी त्यांचे अभीष्टचिंतन केले. मुंबई मधील स्व. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथील सिंहगड कार्यालयात अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
वाढदिवसानिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात आले. पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोर्चेबांधणी, पक्ष संघटना वाढीतील योगदान बघता त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी मुंबई प्रदेशाध्यक्ष पदी नियुक्ती केल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे. विशेषतः नाशिक मधील पदाधिकारी व कार्यकर्ते येऊन भव्य सत्कार केल्याने उत्साहाचे वातावरण होते.
यावेळी युवक जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ, चेतन कासव, शहर पदाधिकारी अमोल नाईक, संदीप गांगुर्डे, संतोष भुजबळ, संदीप खैरे, हरीश महाजन, रोहित पाटील, अक्षय गांगुर्डे, विशाल नाईक, अमर जगताप, प्रज्योत सुरवाडकर, आकाश म्हस्के, शुभम महाजन, सचिन आहेर, जयेश पिंपळीसकर, भूषण बागुल आदींसह मोठया संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.