मुंबई: ‘एक दिन एक ऐसा योद्धा पैदा होगा जो अमर होगा, वो अमीरों और गरीबों के बीच की दीवार गिराएगा…वो योद्धा मरेगा नहीं मारेगा’ या जबरदस्त डायलॉगसह टायगर श्रॉफच्या(tiger shroff) गणपतचा ट्रेलर(Ganpath Trailer) सुरू होतो. टायगर श्रॉफ आणि कृती सॅनॉन यांच्या आगामी गणपत सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. २ मिनिटे ३० सेकंदाचा हा ट्रेलर जबरदस्त आहे. यात लव्हस्टोरीही आहे आणि भरपूर अॅक्शनही.
दरम्यान, या सिनेमातील अॅक्शन ही काही नवीन आहे. मनोरंजनाचा डबल डोस देण्यासाठी सिनेमात अमिताभ बच्चनही दिसत आहेत.
कसा आहे ट्रेलर
गणपतच्या ट्रेलरची सुरूवात एका वेगळ्याच दुनियेने होते. हे २०७० सालचे जग आहे यात श्रीमंत आणि गरीब यांच्यात फरक दाखवला आहे. या दरम्यान गरिबांच्या जगात श्रीमंत खलनायकाची एंट्री होते. ज्याच्यासाठी केवळ पैसा महत्त्वाचा आहे. कृती सॅनॉन या श्रीमंतांच्या जाळ्यात अडकते आणि तेथून सुरू होते गुड्डूची गणपत बनण्याची कहाणी.
सिनेमात ग्राफिक्स आणि व्हीएफएक्सचा वापर करण्यात आला आहे. दरम्यान, टायगरचे अॅक्शन सीन्स पाहून तुम्हाला त्याच्या वॉर, बागी तसेच हिरोपंतीची आठवण नक्की येईल. सिनेमात अमिताभ यांचा लूक जबरदस्त दिसत आहे. आता हे पाहावे लागेल की त्यांचा सिनेमातील रोल किती असणार आहे.