Tuesday, July 23, 2024
Homeताज्या घडामोडीShare Market : इस्रायल-हमास युद्धाचा गुंतवणूकदारांना जबर फटका!

Share Market : इस्रायल-हमास युद्धाचा गुंतवणूकदारांना जबर फटका!

मुंबई : इस्त्रायल आणि हमासमध्ये सुरू झालेल्या युद्धात भारतीय शेअर बाजारातील (Share Market) गुंतवणूकदार चांगलेच होरपळले. युद्धाची चिंता, कच्चे तेल आणि इतर वस्तूंच्या किमती वाढण्याची भीती यामुळे जागतिक बाजारातील घसरणीमुळे शेअर बाजारात आज मोठी घसरण दिसून आली.

आज बाजारातील (Share Market) व्यवहार स्थिरावले तेव्हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ४८३ अंकांच्या घसरणीसह ६५,५१२ अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १४१ अंकांच्या घसरणीसह १९,५१२ अंकांवर बंद झाला.

आज सेन्सेक्समधील ३० कंपन्यांपैकी फक्त ३ कंपन्यांचे शेअर्स तेजीसह बंद झाले. तर, निफ्टी निर्देशांकातील ५० पैकी ७ कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली.

आज सर्वच सेक्टरमधील शेअर्समध्ये घट झाली. सकाळच्या वेळी तेजीत असणाऱ्या आयटी सेक्टरमध्येही घसरण दिसून आली. आजच्या व्यवहारात बँकिंग, ग्राहकोपयोगी वस्तू, ऑइल अॅण्ड गॅस, एनर्जी, ऑटो, आयटी, फार्मा, हेल्थकेअर, मीडिया, मेटल सेक्टरमधील शेअर्समध्ये घसरण दिसून आली. मिड कॅप आणि स्मॉल कॅप निर्देशांकातही मोठी घसरण दिसून आली आहे. निफ्टी मिड कॅप १.३४ टक्क्यांच्या घसरणीसह ३९,७४४ अंकांवर आणि स्मॉल कॅप निर्देशांक १.७८ टक्क्यांच्या घसरणीसह १२,६०९ अंकांवर बंद झाला.

मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल आज ९ ऑक्टोबर रोजी ३१५.९४ लाख कोटी रुपयांवर घसरले. मागील व्यवहाराच्या दिवशी म्हणजे शुक्रवार, ६ ऑक्टोबर रोजी बाजार भांडवल ३१९.८६ लाख कोटी रुपये होते. आज झालेल्या घसरणीमुळे बाजार भांडवलात ३.९२ लाख कोटी रुपयांची घट झाल्याने गुंतवणूकदारांची संपत्ती ३.९२ लाख कोटींनी घसरली.

मुंबई शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या बहुतांशी कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली. एक्सचेंजमध्ये आज एकूण ३,९२९ शेअर्सचे व्यवहार झाले. यापैकी ९९३ कंपन्यांच्या शेअर दरात तेजी दिसून आली. तर, २,८०४ कंपन्यांच्या शेअर दरात घसरण दिसून आली. तर १२२ कंपन्यांच्या शेअर दरात कोणताही बदल झाला नाही. याशिवाय आजच्या व्यवहारादरम्यान २४० कंपन्यांच्या शेअर दरांनी त्यांचा ५२ आठवड्यांचा उच्चांक दर गाठला. तर ३७ कंपन्यांच्या शेअर दराने त्यांचा ५२ आठवड्यांचा नीचांक दर गाठला.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -