Friday, October 31, 2025
Happy Diwali

इस्त्रायल-हमास यांच्यात युद्ध सुरूच, ९७० जणांचा मृत्यू

इस्त्रायल-हमास यांच्यात युद्ध सुरूच, ९७० जणांचा मृत्यू

गाझा: फिलिस्तानचे(palestine) दहशतवादी हमासने(hamas) शनिवारी ७ ऑक्टोबरला इस्त्राईलवर(israel) जोरदार हल्ला केला. त्यानंतर पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हमासविरुद्ध युद्धाची घोषणा केली. हमासचे दहशतवादी आणि इस्त्राईलचे लष्कर यांच्यात युद्ध सुरू आहे. या युद्धात दोन्ही बाजूंचे तब्बल ९७०हून अधिक लोक मारले गेले आहेत.

बीबीसीच्या माहितीनुसार हमासच्या हल्ल्यात इस्त्राईलमधील ६०० लोकांचा मृत्यू झाला तर दोन हजाराहून अधिक जण जखमी आहेत. याशिवाय १०० लोकांना किडनॅप करण्यात आले आहे. तर दुसरीकडे इस्त्राईलच्या लष्कराच्या हल्ल्यात फिलिस्तानचे ३७० लोक मारले गेले आणि २२००हून अधिक जण जखमी झालेत.

इस्त्राईलच्या लष्कराच्या कारवाईनंतर दहशतवादी हमासने युद्धाची तीव्रता अधिकच वाढवली आहे. हमासने दावा केला की त्यांनी दक्षिण इस्त्राईलचे शहर स्टेरोटच्या दिशेने १०० रॉकेट्स टाकले. रॉकेट हल्ल्यात काही जणांना दुखापती झाल्या.

कधी झाली हल्ल्याची सुरूवात?

हमासच्या हल्ल्यानंतर शनिवारी सकाळी ६ वाजून ३५ मिनिटांनी मध्य आणि दक्षिण इस्त्राईलमध्ये सायरन वाजला. हमासकडून इस्त्राईलवर हजारो रॉकेट टाकण्यास सुरूवात केली. सकाळी ७ वाजून ४० मिनिटांनी इस्त्राईलच्या सुरक्षा दलाने सांगितले की हमासच्या युद्धखोरांनी गाझा येथून दक्षिण इस्त्राईलमध्ये प्रवेश केला आहे. यानंतर यरूशलममध्येही सायनर वाजला.सकाळी ८ वाजून २३ मिनिटांनी दक्षिण इस्त्राईलमध्ये लोकांना ताब्यात घेण्यात आले आणि एकामागोमाग एक रॉकेट सोडण्यात आले. यानंतर इस्त्राईलने युद्धासाठी अलर्ट जारी केली.

सकाळी १० वाजून ३४ मिनिटांनी इस्त्राईलने हमासविरुद्ध युद्धाची घोषणा केली आणि १० वाजून ४६ मिनिटांनी गाझावर हल्ला केला. यानंतर इस्त्राईलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी पहिले विधान केले की आम्ही युद्धात आहोत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >