
चेन्नई: विश्वचषक २०२३मध्ये(world cup 2023) टीम इंडियाला(team india) पहिला विजय मिळवून देणाऱ्या केएल राहुलने सामन्यानंतर एक मजेदार किस्सा ऐकवला. प्लेयर ऑफ दी मॅच झालेल्या केएल राहुलने सांगितले की तो ऑस्ट्रेलियाच्या डावानंतर आंघोळ करून काही वेळ आराम करण्याबाबत विचार करत होता मात्र टीम इंडियाचे धडाधड विकेट पडल्याने त्याला पिचवर उतरावे लागले.
ऑस्ट्रेलियाकडून विजयासाठी मिळालेल्या २०० धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची अवस्था सुरूवातीला २ धावांवर ३ विकेट अशी झाली होती. रोहित शर्मा, इशान किशन आणि श्रेयस अय्यर शून्यावर बाद झाले होते. त्यानंतर विराट कोहली(८५) आणि केएल राहुल(९७) यांच्यात १६५ धावांची भागीदारी झाली. यामुळे भारताला विजय साकारता आला.
सामन्यानंतर राहुल म्हणाला, मी आंघोळ करून बाहेर निघत होतो आणि विचार करत होतो की अर्धा तास आराम करू मात्र मला फलंदाजीसाठी यावे लागले. विराटने मला फक्त इतकेच सांगितले की येथे थोडा वेळ कसोटी क्रिकेटसारखे खेळावे लागेल. संघासाठी चांगला खेळ करू शकलो यासाठी मी खुश आहे. येथे सुरूवातीला वेगवान गोलंदाजांसाठी थोडी मदत होती. मात्र त्यानंतर दवाने आपली भूमिका निभावली.
"𝘐 𝘵𝘩𝘰𝘶𝘨𝘩𝘵 𝘐'𝘥 𝘨𝘦𝘵 𝘢 𝘨𝘰𝘰𝘥 𝘴𝘩𝘰𝘸𝘦𝘳." pic.twitter.com/ZSgcNAJZ2v
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) October 8, 2023
पिचबाबत काय म्हणाला राहुल?
ही पिच दोन्ही बाजूंना गती देणारी होती. फलंदाजीसाठी चांगली विकेट नव्हती मात्र जास्त अडचणीही येत नव्हत्या. मला वाटते की क्रिकेटसाठी ही चांगली पिच होती.
तीन धावांनी हुकले शतक
केएल राहुलने आपले शतक हुकल्याबाबत सांगितले की मी शेवटच्या बॉलवर चांगले हिट केले होते. मला आधी चौकार आणि त्यानंतर षटकार ठोकत शतक पूर्ण करायचे होते. आशा आहे की पुढील वेळेस मी यशस्वी ठरेन.