नवी दिल्ली : राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या (assembly election) तारखा जाहीर झाल्या आहेत.
मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) राजीव कुमार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले की, छत्तीसगडमध्ये ७ आणि १७ नोव्हेंबर रोजी दोन टप्प्यात मतदान होणार आहे.
मिझोरममध्ये ७ नोव्हेंबर, मध्य प्रदेशात १७ नोव्हेंबर, राजस्थानमध्ये २३ नोव्हेंबर आणि तेलंगणात ३० नोव्हेंबरला एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. पाचही राज्यांचे निकाल ३ डिसेंबरला लागणार आहेत.
मुख्य निवडणूक आयुक्त म्हणाले की, या राज्यांमध्ये एकूण १६.१४ कोटी मतदार आहेत. यामध्ये ८.२ कोटी पुरुष आणि ७.८ कोटी महिला मतदार असतील. यावेळी ६०.२ लाख नवीन मतदार प्रथमच मतदान करणार आहेत.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra