अविश्वास ठराव आणला, सरपंच पद गेलं, पण पुन्हा सरपंच झाले!

नांदगाव : दीड महिन्यांपूर्वी नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील हिसवळ खुर्द ग्रामपंचायतीचे अनुसूचित जाती प्रवर्गातून कैलास फुलमाळी हे सरपंच झाले. पण, अविश्वास ठराव आणून त्यांना सरपंच पदावरून पायउतार करण्यात आले. मात्र त्यांनी शासकीय पातळीवर लढा दिला. रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक झाली. याच पोटनिवडणुकीत ते पुन्हा सरपंच झाले.


घटनेने दिलेल्या अधिकारापासून वंचित ठेवणाऱ्यांना आणि अविश्वास ठराव दाखल करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्यांना सरपंच कैलास फुलमाळी यांनी चांगलीच चपराक दिली. दिड महिन्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत फुलमाळी यांचा एकमेव अर्ज आला. त्यामुळे प्रशासनाने पुन्हा त्यांची सरपंच म्हणून नियुक्ती केली. नांदगाव तालुक्यातील ही घटना ऐतिहासिक घटना मानली जाते.


गमावलेले पद संवैधानिकरित्या परत मिळाल्याने सरपंच फुलमाळी यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी मंडल अधिकारी आर एम परदेशी, तलाठी ननई, ग्रामसेवक मनीष भाबड, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ आहेर, विलास आहेर, दत्तू आहेर, डॉ. पुंजाराम आहेर, दशरथ आहेर, साहेबराव जगताप, किरण आहेर, कचरू आहेर, सुधाकर आहेर, आण्णा जगताप, देवचंद फुलमाळी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.



Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 
Comments
Add Comment

Canva glitch : कॅनव्हा सेवेवर तांत्रिक संक्रांत; जगभरातील वापरकर्त्यांना फटका, सेवा आता पूर्वपदावर

डिझाइनिंग क्षेत्रातील आघाडीचे प्लॅटफॉर्म असलेल्या 'कॅनव्हा' (Canva) वर २ जुलै रोजी तांत्रिक बिघाड झाल्याने जगभरातील

Nashik : मडक्यात सापडला ‘गावठी कट्टा’; पोलिसांच्या तपासानंतर मात्र वेगळंच सत्य समोर

Nashik : सातपूर येथील पपया नर्सरी परिसरात एका घराबाहेर ठेवलेल्या रिकाम्या पाण्याच्या मडक्यात बंदुकीसारखी वस्तू

Salman Khan : ॲनिमे प्रिंटपासून पॅचवर्क पँट्सपर्यंत... सलमान खानने आपल्या हटके ट्राउझर्सद्वारे निर्माण केला नवा फॅशन ट्रेंड!

Salman Khan : फॅशन (Fashion) , लाईफस्टाईल (Lifestyle) अन अॅक्टींग (Acting) पहावी ती सलमान खानचीच (Salman Khan) असे सलमान प्रेमी म्हणजेच भाईप्रेमी

Ek Hota Malin : एका रात्रीत अख्खं गाव मातीखाली गाडलं गेलं... अंगावर शहारे आणणारा 'एक होतं माळीण'चा टीझर प्रदर्शित

Ek Hota Malin Marathi Movie : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीण... ३० जुलै २०१४ ची ती काळरात्र आजही महाराष्ट्र विसरलेला

India in Venezuela : व्हेनेझुएलामधील भारताची मदत मोहीम अधिक तीव्र; चोवीस तास मोफत वैद्यकीय सेवा सुरू

व्हेनेझुएला : ऑपरेशन ‘अमिस्ताद’ (Amistad)अंतर्गत भूकंपग्रस्त व्हेनेझुएलामध्ये तैनात भारतीय लष्कराचे फील्ड

Ahilyanagar : सार्वजनिक ठिकाणी गांजा ओढताना 65 जण रंगेहाथ ताब्यात; पोलिसांच्या कारवाईने परिसरात खळबळ

Ahilyanagar : जिल्ह्यात वाढत्या अंमली पदार्थांच्या गैरवापराला आळा घालण्यासाठी अहिल्यानगर पोलिसांनी (Ahilyanagar Police) मोठी धडक