Wednesday, April 23, 2025
Homeताज्या घडामोडीफ्रीजच्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्याने एकाच कुटुंबातील ५ जण जिवंत जळाले

फ्रीजच्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्याने एकाच कुटुंबातील ५ जण जिवंत जळाले

जालंधर : पंजाबमधील जालंधरमध्ये फ्रीजच्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाल्याने रात्री उशिरा एका घराला आग लागली. या आगीच्या घटनेत एकाच कुटुंबातील ३ मुलांसह ५ जणांचा भाजल्याने मृत्यू झाला.

जालंधरच्या अवतार नगर येथील गल्ली क्रमांक १२ मध्ये ही घटना घडली. मृत यशपाल घई यांचा भाऊ राज घई यांनी सांगितले की, त्यांच्या भावाने फक्त ७ महिन्यांपूर्वी नवीन डबल डोअर रेफ्रिजरेटर विकत घेतला होता. रात्री उशिरा कॉम्प्रेसरमध्ये मोठा स्फोट झाला आणि त्यानंतर घराला आग लागली.

या दुर्घटनेत ६५ वर्षांच्या आसपास असलेला त्यांचा भाऊ, त्यांचा मुलगा, सून आणि घरात बसलेल्या दोन मुलींना घराबाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. त्यांची वृद्ध वहिनी बलबीर कौर ही घराबाहेर बसली होती. त्यामुळे ती सुरक्षित आहे.

रूची, दिया, अक्षय, यशपाल घई आणि मनशा अशी मृतांची नावे आहेत. तर यशपाल यांचा मुलगा इंद्रपाल हा गंभीर जखमी आहे. त्याला रात्री उशिरा डीएमसी लुधियानाला पाठवण्यात आले आहे.

रात्री घरातील सर्व सदस्य क्रिकेट मॅच पाहत होते. तेवढ्यात मोठा स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर काही क्षणातच आग लागली. घरात बसलेल्या कुटुंबीयांना काही विचार करण्याआधीच ते सर्वजण आगीत होरपळून बेशुद्ध झाले. स्फोटाचा आवाज ऐकून परिसरातील रहिवासी बाहेर आले असता त्यांना घराला आग लागल्याचे दिसले.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -