नवी दिल्ली : इस्त्रायल आणि फिलीस्तान यांच्यातील युद्ध चागंलेच पेटले आहे. येथील भीषण परिस्थितीचे व्हिडिओ तसेच फोटो समोर येत आहेत. याच दरम्यान सोशल मीडियावर अल जजिराच्या एका रिपोर्टचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे.
यात तुम्ही पाहू शकता की इस्त्रायल आणि हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान गाझा येथून एक रिपोर्टर लाईव्ह रिपोर्टिंग करत होती. त्याचवेळेस तिच्या मागील एका इमारतीवर बॉम्ब हल्ला होतो.
A building behind Al Jazeera reporter bombed while she reports live from Gaza! #Gaza #Israel
— Ieshan Wani (@Ieshan_W) October 7, 2023
हा बॉम्ब हल्ला होताच ती रिपोर्टर भीतीने जोरात ओरडते. कारण मागे एका पॅलेस्टाईन टॉवरवर बॉम्ब हल्ला करण्यात आलेला असते. ज्या इमारतीवर बॉम्ब हल्ला करण्यात आला तेथून काळा धूर निघत असल्याचे दिसते. तर स्टुडिओमध्ये बसलेले अल जजिराचे अँकर जे या बॉम्बहल्ल्यावेळेस रिपोर्टरशी बोलत आहेत तिला कव्हर घेण्यास सांगतात.
सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतो. यात न्यूज अँकर या रिपोर्टरला कव्हर घेण्यास सांगतो. तसेच सुरक्षित स्थानावर पोहोचण्यास सांगतो. त्यावेळेस ही रिपोर्टर थरथरत्या आवाजात तेथील वृतांत देते. यावेळेस अँकर तिला सांगतो की थोडा वेळ थांबून श्वास घे. तु आणि तुझी टीम थोडा वेळ थांबा.