चेन्नई: एकदिवसीय विश्वचषक २०२३च्या(one day world cup 2023) सामन्यात भारतीय संघाच्या नावावर लाजिरवाणा रेकॉर्ड झाला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नईच्या चेपॉक स्टेडियममध्ये खेळवल्या जात असलेल्या सामन्यात दोघेही सलामीवीर शून्यावर बाद झाले.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड यांनी भारतीय सलामीवीरांना बाद केले. वर्ल्डकपमध्ये ४० वर्षांनी असे घडले की भारताचे दोनही सलामीवीर शून्यावर बाद झाले. याआधी १९८३च्या विश्वचषकात असे घडले होते.
आजच्या सामन्यात भारताकडून कर्णधार रोहित शर्मासह इशान किशन मैदानात उतरला होता. इशान किशन पहिल्याच ओव्हरमध्ये मिचेल स्टार्कच्या बॉलवर गोल्डन डक झाला. स्लिपवर उभ्या असलेल्या कॅमेरून ग्रीनने इशानचा कॅच पकडला. त्यानंतर डावाच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये रोहित शर्मा खाते न खोलता जोश हेझलवूडच्या बॉलवर बाद झाला. हेझलवूडने ओव्हरच्या तिसऱ्या बॉलवर भारताचा कर्णधार एलबीडब्लू होत पॅव्हेलियनमध्ये परतला. ५ बॉल खेळल्यावर रोहित शर्मा सहाव्या बॉलवर बाद झाला.
याआधी १९८३च्या वर्ल्डकपमध्ये भारताचे सलामीवीर झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात खाते न खोलता पॅव्हेलियनमध्ये परतला. झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात भारताकडून सुनील गावस्कर आणि श्रीकांत सलामीसाठी उतरले होते. गावस्कर दुसऱ्याच बॉलवर खाते न खोलता बाद झाले तर श्रीकांत १३व्या बॉलवर शून्यावर बाद झाले होते.
वर्ल्डकपमध्ये शून्यावर बाद झाले भारताचे दोनही सलामीवीर
झिम्बाब्वेविरुद्ध १९८३च्या वर्ल्डकपमध्ये – टुनब्रिज
ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०२३च्या वर्ल्डकपमध्ये – चेन्नई