मुंबई: इस्त्रायल आणि फिलिस्तान यांच्यात सुरू असलेल्या संघर्षादरम्यान बॉलिवूडमधून एक हैराण करणारी बातमी समोर येत आहे. अभिनेत्री नुसरत भरूचा इस्त्रायलमध्ये अडकली आहे. तिच्या टीमच्या एका सदस्याने हे वृत्त कन्फर्म केले आहे.
शनिवारी दुपारपासून संपर्क नाही
मीडियाशी शेअर करताना या सदस्याने माहिती दिली की नुसरत भरूचा इस्त्रायलमध्ये अडकली आहे. ती हायफा आंतरराष्ट्रीय सिने महोत्सवात सहभागी होण्यासाठी तेथे गेली होती. तिच्या टीमकडून देण्यात आलेल्या मेसेजनुसार शनिवारी दुपारी १२ वाजता तिच्याशी संपर्क झाला होता. त्यावेळेस ती एका बेसमेंटमध्ये होती आणि सुरक्षित होती.
सुरक्षेचा उपाय म्हणून अधिक माहिती उपलब्ध होऊ शकत नाही. दरम्यान, तिच्याशी सातत्याने संपर्क केला जात आहे. तिच्या टीमने दिलेल्या माहितीनुसार आम्ही सातत्याने तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहोत. आम्ही नुसरतला सुरक्षितरित्या भारतात आणण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आशा करतो की ती सुरक्षितरित्या घरी परतेल.
अकेली सिनेमात दिसली होती अभिनेत्री
गेल्याच ऑगस्ट महिन्यात सिने अभिनेत्री नुसरत भरूचा हिचा अकेली हा सिनेमा रिलीज झाला होता. या सिनेमाची गोष्ट अशी की एक मुलगी इराकच्या युद्धात कोणत्या कारणामुळे अडकते. युद्धाच्या या माहोलदरम्यान एक एकटी मुलगी कशी घरी परतते याच्या संघर्षाची कहाणी.