Wednesday, October 22, 2025
Happy Diwali

नाशिक रोडमध्ये कोट्यावधीचा एम डीचा कच्चा माल जप्त

नाशिक रोडमध्ये कोट्यावधीचा एम डीचा कच्चा माल जप्त
नाशिकरोड पोलिसांची अभिनंदनीय कारवाई

नाशिक जिल्ह्यासह महाराष्ट्राला हादरवून टाकणारी कारवाई मुंबई साकीनाका पोलिसांनी नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत केल्यानंतर नाशिक पोलिस देखील सतर्क झाले असून आज दिवसभरात शिंदे पळसे भागात शोध घेऊन नाशिकरोड पोलिसांनी आणखी एक गोडाऊन हुडकून काढले आहे.देर आयें दुरुस्त आयें या उक्तीप्रमाणे साकी नाका पोलिसांच्या कारवाईनंतर सजग झालेल्या नाशिक शहर पोलिसांना या कारवाईमुळे मोठे यश आले असून अभिनंदनास पात्र अशी कारवाई केली आह शिंदे गावात या आधी सील केलेल्या कारखान्यापासून नजीकच्या एका गोडाऊनमध्ये एमडी तयार करण्यासाठी वापरला जाणार कोट्यावधी रुपयांचा कच्चा माल नाशिकरोड पोलिसांनी जप्त केल्याची प्राथमिक चर्चा असली पोलिसांकडून मुद्देमालाबाबत अधिकृत आकडेवारी मात्र सांगितली गेली नाही. अजून कारवाई सुरूच असून कारवाई पुर्ण झाल्यानंतरच खरा आकडा बाहेर येईल.

गेल्या काही वर्षात एमडी या घातक ड्रग्जने नाशिक शहरातील तरुणाईला आपल्या विळख्यात घेतले आहे. शाळा कॉलेजचे विद्यार्थी हेरून या ड्रग्जचा व्यापार वाढवला जात होता. एकावेगळ्या अर्थाने लव्ह जिहाद, लँड जिहाद प्रमाणेच नाशिक शहरात एमडी जिहाद सुरु असल्याची संतप्त प्रतिक्रिया एका जाणकाराने प्रहारशी बोलतांना दिली. मानवी शरीरासाठी घातक असलेल्या या ड्रग्समुळे अनेकांना आपला जीव गमावावा लागला आहे.सजग होऊन सक्रिय झालेल्या नाशिक शहर पोलिसांनी या प्रकरणाची यापुढे तरी गांभीर्याने दखल घेऊन हा जिहाद मोडून काढावा अशा अपेक्षा व्यक्त होत असतानाच यापूर्वी अलीकडच्या काळात ज्यांनी ज्यांनी या धंद्याला मदत केली त्यांचीही चौकशी झाल्यास भयंकर स्वरूप चव्हाट्यावर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान हे वृत्त लिहीत असतांनाही रात्री उशिरापर्यंत घटनास्थळावर मुद्देमालाची मोजदाद सुरु असून परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या समवेत सहा. पोलिस आयुक्त आनंदा वाघ, वपोनि देविदास वांजुळे, सहा. पोलिस निरीक्षक हेमंत फड आदी अधिकारी मॉनीटरिंग करीत आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा